Jalna Crime : वाळूमाफीयाने ट्रॅक्टर पोलिसांच्या अंगावर घातले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna Crime News

Jalna Crime : वाळूमाफीयाने ट्रॅक्टर पोलिसांच्या अंगावर घातले

घनसावंगी (जि.जालना) : घनसावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस पथक अंतरवाली टैंभी शिवारात अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर चालकांस थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर ट्रॅक्टरचालकांने ट्रॅक्टर पोलिस पथकांच्या अंगावर घालून ट्रॅक्टरची वाळूसह ट्रॉली रस्त्यात सोडून देवून पलायन केले या प्रकरणी सदर ट्रॅक्टर चालकांच्या विरोधात शुक्रवार (ता.19) घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

घनसावंगी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पी. डी. डोलारे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारार्फत अंतरावाली टेंभी शिवारातील नरोळा नदीतून इसम नामे सुनिल इंद्रजीत भोजणे हा एका निळ्या रंगाच्या सोनिलीका कंपनीचे ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैधरित्या वाळुची चोरटी वाहतूक करीत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून सदर माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. पी. पतंगे यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवार (ता.18) उपनिरीक्षक पी. डी. डोलारे , चालक पोलीस जमादार कुंटे, भागवत हरीचंद्रे, एसलोटे व इतर दोन जण यांनी अंतरवाली टेंभी शिवारातील नरोळा नदीच्या कडेला पांढरे वस्तीजवळ आले.

गुप्त बातमीच्या अनुशांगाने ठिक पाच वाजून 45 मिनीट वाजेच्या सुमारास नरोळा नदीकडुन एक निळ्या रंगांचे ट्रॅक्टर क्रंमाक एम.एच. 21 बी. क्यू. 5558 हे येताने दिसल्याने चालक नामे सुनिल इंद्रजीत भोजणे रा. कोठी ता. घनसावंगी यास हात दाखवून ट्रॅक्टर थांबवण्याचा इशारा केला, असता सदर ट्रॅक्टर चालकाने त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर भरधाव वेगाने जिवे मारण्याचे उद्देशाने पोलिस जमादार श्यामसुंदर देवडे यांच्या अंगावर घातले.

हेही वाचा: विराटपेक्षा भारी ठरतोय रोहित, दुसऱ्या मॅचमध्ये पुन्हा दिसली झलक

परंतु, त्यांनी रस्त्याचे बाजुला उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला दरम्यान पोलिस वाहनाव्दारे सदर ट्रॅक्टरचा पाठलाग केला. परंतु सदर ट्रॅक्टर चालकाने रस्त्याच्या मध्यभागी ट्रॅक्टरची ट्रॉली सोडून देवुन ट्रॅक्टर (हेड) सह पळून गेला. सदरची ट्रॉली ही रस्त्याच्या मध्यभागी असल्याने पोलिसांना गाडी समोर नेता आली नाही. त्यानंतर सदर ट्रॉलीची पाहणी केली असता त्यात अंदाजे एक ब्रास वाळू मिळुन आल्याने दोन पंचासमक्ष सविस्तर पंचनामा करुन सदर ट्रॉली तपास कामी ताब्यात घेतली आहे.

तसेच ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये अंदाजे 01 ब्रास वाळु जिची अंदाजे तीन हजार रूपये किंमत व सत्तर हजार रूपये किमतीची विटकरी रंगाची विना नंबरची व विना चेसिस क्रमांकाची ट्रॉली असे एकूण 73,000 हजार रूपयांचा एैवज जप्त करून पोलिस जमादार श्यामसुंदर देवडे यांनी घनसावंगी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ट्रॅक्टरचालक सुनिल इंद्रजीत भोजणे रा. कोठी यांने त्यांच्या स्वताचे ताब्यातील एक निळ्या रंगाचे सोनालिका ट्रँक्टर ज्याचा पासिंग क्रंमाक एम.एच. 21 बी.क्यू. 5558 सह तेथुन पळून गेला व शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करुन त्याचे ताब्यातील टॅक्टर भरधाव वेगाने जिवे मारण्याचे उद्देशाने अंगावर घातले म्हणुन त्यांच्या विरुोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पी.डी.गोल्हारे हे करीत आहे.

loading image
go to top