परभणी रिमझिम पावसाने सुखावले!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

परभणी : परभणी शहरासह सेलू, जिंतूर, पालम, सोनपेठ या तालुक्यात गुरुवारी (ता.11) दुपारी तीन वाजता हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. अद्यापही काही भागात रिमझिम पाऊस सुरु आहे.

मागील अनेक दिवसापासून पाऊस हुलकावणी देत आहे. त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या पेरण्या धोक्यात आल्या असून निम्मे क्षेत्र पडीक राहीले आहे. दररोज आभाळ भरुन येत आहे. मात्र पाऊस काही पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

दररोजच्या प्रमाणे गुरुवारीही सकाळपासून आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले होते. अंधारुन आल्याने अनेकदा हलक्या सरी कोसळत होत्या. दुपारी तीन वाजता परभणी शहर आणि परिसरात दहा ते पंधरा मिनीटे जोरदार पाऊस झाला. त्यानंतरही रिमझिम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. जिंतूर शहर आणि तालुक्यात दुपारी दोन वाजता पावसाला सुरुवात झाली होती. अर्धा तास चांगला पाऊस झाला. पालम, सोनपेठ तालुक्यातही रिमझिम पाऊस होता. सेलू तालुकक्यातील देवगाव फाटा परिसरात हलका पाऊस झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drizzle rain made Parbhani rejoice

टॅग्स