दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता

Drought
Drought

बीड - निम्माही पाऊस नाही, पिके करपून गेली, रब्बी तर गेली; पण खरिपाचीही आशा मावळली. सगळे जलस्रोत कोरडे. अशा भीषण दुष्काळी परिस्थितीने शेतकरी चिंतेत असताना प्रशासनाने ५० टक्‍क्‍यांहून अधिक नुकसान झाल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठविल्याने यंदा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होण्याच्या आशा उंचावल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या दुष्काळी मदतीचा थोडाबहुत दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६६६.३६ मिलिमीटर असून आतापर्यंत केवळ ३३४.३० मिलिमीटर (५०.१७ टक्के) एवढाच पाऊस पडला आहे.

सुरवातीला झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या अगदी अपेक्षेपेक्षा जास्त क्षेत्रावर झाल्या. मात्र, पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन, कपाशीचा खराटा झाला. पेरणीचा खर्चही निघणे दुरापास्त झाले. रब्बी पेरणीच्याही आशा मावळल्या. नद्या, साठवण तलाव, गावतलाव कोरडेठाक असल्याने आगामी काळात भीषण दुष्काळाची चाहूल लागलेली असताना मधल्या काळात नजर पैसेवारी ५० पेक्षा जास्त असल्याचा अहवाल धडकला आणि शेतकऱ्यांमधून संतापाची लाट उमटली. नजर पैसेवारी जास्त दिसल्याने कुठलीही दुष्काळी मदत मिळणार नाही, या चिंतेने शेतकरी ग्रासले होते. मात्र, २८ जूनच्या शासन निर्णयानुसार प्रशासनाने पीक परिस्थितीची पाहणी करून दुष्काळ जाहीर होईल, असा वस्तुनिष्ठ आणि सकारात्मक अहवाल आयुक्तांना पाठविला आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदा दुष्काळ जाहीर होईल, अशी माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली.

अशी केली १४१ गावांत पाहणी 
दुष्काळ जाहीर करण्यासाठी महसूल, कृषी व पंचायत विभागाच्या पथकाने ट्रिगर वन आणि ट्रिगर टू अशा दोन टप्प्यांत पाहणी केली. प्रत्येक तालुक्‍यातील एकूण गावांच्या १० टक्के गावांत ही पाहणी करायची असल्याने जिल्ह्यातील १४१ गावांत पाहणी झाली. निवडलेल्या प्रत्येक गावांतील पाच पिके निवडून फुलोऱ्यातील पिके, काढणीस आलेली पिके, एकूण पडलेला पाऊस, पावसाने खंड दिलेला कालावधी, जलस्रोतांत उपलब्ध असलेले पाणी आणि जमिनीखालील पाण्याची पातळी याची पाहणी करून सर्वच तालुक्‍यांत ५० टक्‍क्‍यांहून अधिक पीक नुकसान झाल्याचा अहवाल आहे. त्यामुळे शासनाकडून दुष्काळ जाहीर होऊन शेतकऱ्यांना मदतीचा हातभार लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com