Ramdas Athavale
Ramdas Athavale

नदीजोड प्रकल्प योजनेतुन दुष्काळमुक्ती शक्य : रामदास आठवले

नांदेड : नदिजोड प्रकल्प योजना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना आहे. बाबासाहेबांच्या संकल्पनेतील नदिजोड प्रकल्प योजनेची आज
अमलबजावणी झाल्यास महाराष्ट्रातीलच नव्हे तर, सर्वच राज्यातील गंभीर दुष्काळाच्या परिस्थितीवर सहज मात करता येणे शक्य आहे, असे मत रिपल्बिलकन पार्टी आॅफ इंडिया (अ) चे अध्यक्ष तथा केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

विदर्भाचा दुष्काळी दौरा करून आठवले शनिवारी (ता. ११) नांदेडच्या
दौऱ्यावर आले. त्यावेळ ते पत्रकारांसोबत बोलत होते. ते म्हणाले की, सध्या
लोकसभेच्या निवडणूकीची आचारसंहिता सुरु अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दुष्काळ निवारण्यासाठी नेत्यांना दौरा करता यावा म्हणून
निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. त्यानुसार केंद्रिय निवडणूक आयोगाने दुष्काळाची पहाणी करण्यासाठी शिथिलता दिल्याने नेते आणि मंत्री यांचे दुष्काळी दौरे सुरु झाले आहेत. विदर्भातील दुष्काळ हटविण्यासाठी मुंबई आणि कोकणाच्या किनारपट्टीवर पडणाऱ्या पावसाचे पाणी विदर्भात वळवल्यास दुष्काळ निवारण्यासाठी मोठी मदत होऊ शकेल. त्या सोबतच सिंचनाचा प्रश्न हा गंभीर होत असल्याने त्याकडेही गांभिर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

विनोबा भावे यांच्या भुदान योजनेच्या धर्तिवर भुमिहीनांना पाच एकर जमिन
दिल्यास त्यांचे शहराकडे होणारे स्थलांतर थांबवता येईल. पुणे-मुंबईतील
उद्योजकांनी मराठवाड्यातील जिल्ह्यात उद्योग धंदे उभारल्यास स्थानिक
तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. कौशल्य विकास कार्यक्रमाच्या
माध्यमातुन युवक स्वावलंबनाकडे वळतील असे ते म्हणाले. राज्य सरकार आणि समाजकल्याण अधिकारी यांच्या दिरंगाईमुळेच विद्यार्थ्यांना वेळेवर
शिष्यवृत्ती मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

वंचितची भाजपासोबत छुपी आघाडी :
अगामी निवडणूकीच्या काळात वंचित बहुजन आघाडीने जास्तीत जास्त जागा लढाव्यात. त्याचा थेट फायदा भाजप सेनेच्या सरकारलाच होईल. कारण सध्या एनडीए आणि आघाडी सरकार या दोनच पक्षात मतांची विभागणी झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीला याचा फारसा फायदा होणार नाही. बचिंत बहुजन आघाडी ही खरच वंचित घटकांस न्याय देऊ इच्छित असेल तर, त्यांनी भाजपा सोबत छुपी युती न करता उघडपणे युती करावी, असेही आठवले यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com