दारुच्या नशेत पतीने केला महिलेचा खून

A drunken husband killed his wife in aashti beed
A drunken husband killed his wife in aashti beed

आष्टी : पती-पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ भांडणातून पतीने पत्नीच्या डोक्यात बाभळीचा दांडा घालून निर्दयपणे खून केला. तालुक्यातील चोभानिमगाव येथे रविवारी (ता. 24) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अनिता रामा पवार (वय 45 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की चिवा जांभुळपाडा (ता. पाली, जि. रायकड) येथील रामा नावोजी पवार व अनिता रामा पवार हे दाम्पत्य मोलमजुरीसाठी तालुक्यातील चोभानिमगाव येथे महिनाभरापूर्वी आले होते. गावातील मच्छिंद्र राठोड यांच्याकडे ते कामास होते. तसेच बाभळी तोडून त्यापासून कोळसा तयार करण्याचा व्यवसायही हे दाम्पत्य करीत होते.

रविवारी (ता. 24) सायंकाळी अनिता व रामा या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून भांडणे झाली. भांडणात राग अनावर झाल्याने रामा पवार याने काम करीत असलेल्या ठिकाणी असलेला बाभळीचा दांडा अनिता हिच्या डोक्यात मारला. यामुळे मोठा रक्तस्त्राव होऊन ती जागीच कोसळली. घटनेची माहिती झाल्यानंतर मच्छिंद्र राठोड व परिसरातील लोकांनी तिला उपचारार्थ रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या प्रकरणी मच्छिंद्र राठोड यांनी रविवारी रात्री उशिरा आष्टी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून रामा पवार याच्याविरुद्ध गुन्हा खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com