आधार कार्ड लिंक नसल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये गेले परत

due to Aadhar card is not linked insurance payment of farmers is back
due to Aadhar card is not linked insurance payment of farmers is back

बीड- सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड वैध परंतु त्याची सक्ती करता येणार नाही असे स्पष्ट केले असले तरीही बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसल्याच्या कारणाने बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये मंजूर झालेली कोट्यवधी रुपयांची नुकसान भरपाई परत गेली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पीक विम्याचे हफ्ते भरलेले असताना केवळ 1 लाख 71 हजार 453 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते शार्दूल देशपांडे यांनी माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीमुळे हा सर्व प्रकार समोर आला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी चुकीचे आधार क्रमांक तर काहींनी बंद असलेले बचत खाते विमा भरताना दिले असल्याने त्यांचे नुकसान भरपाईचे पैसे वापस गेले आहेत.

बीड जिल्ह्यात प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत खरीफ हंगाम 2017 मध्ये शेतकऱ्यांनी पिकांना विम्याचे संरक्षक कवच दिले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून लाखो शेतकऱ्यांनी विविध बँकांमध्ये विम्याचे हफ्ते भरले होते. पीक विम्याचे अर्ज भरताना शेतकऱ्यांकडून अक्षम्य चुका झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली परंतु, त्यांच्या बचत खात्याला आधार कार्ड लिंक नसल्याने तब्बल 10 हजार शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये वापस गेल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सगळ्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा केलेला असताना फक्त 1 लाख 71 हजार 453 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याची कारणे:-
1) खाते बंद आहे.
2) केवायसी झाले नाही.
3) चुकीचा आधार क्रमांक.
4) बचत खात्याला आधार कार्ड लिंक नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com