कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

प्रल्हाद कांबळे
शुक्रवार, 25 मे 2018

नांदेड - बिलोली तालुक्यातीत धुपा येथील शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केली. शिवाजी सोपान जांभळे (वय ३६) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
                
जांभळे यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. यामुळे ते कर्जबाजारी झाले. कर्जाची परतफेड व संसाराचा गाडा चालविणे त्यांना अवघड जात होते. यामुळे त्यांनी १८ मे रोजी विष प्राशन केले. उपचारादरम्यान शासकिय रुगणालय नांदेड येथे २२ मे रोजी मरण पावला. तपास सपोनि दिलीप गाडे हे करीत आहेत.  

Web Title: due to loan Farmer committed suicides