नांदड येथे ‘गोविंदां’ ची पोलिसांना धक्काबुकी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

गोकुळाष्टमी निमित्त दहिहंडी फोडण्याच्या कार्यक्रमात गैरप्रकाराला आळा घालणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की केली. तसच शासकिय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार दिग्रस खु. (ता. कंधार, जि. नांदड) येथे शनिवारी (ता.२४) दुपारी दोन वाजता घडला.

नांदेड : गोकुळाष्टमी निमित्त दहिहंडी फोडण्याच्या कार्यक्रमात गैरप्रकाराला आळा घालणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की केली. तसच शासकिय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार दिग्रस खु. (ता. कंधार, जि. नांदड) येथे शनिवारी (ता.२४) दुपारी दोन वाजता घडला. 

दिग्रस खु. (ता. कंधार) येथे शनिवारी दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. त्यासाठी कायदा व सुव्यवस्था बाधीत होऊ नये म्हणून कंधार पोलिस ठाण्याच्या फौजदार सुवर्णा उमाप यांच्या पथकाला तैनात करण्यात आले होते. त्यांनी आपले सहकारी घेऊन दिग्रस गाठले. दुपारी दहिहंडी फोडतांना गोविंदांच्या अंगावर पाणी फेकण्या ऐवजी चप्पल, बुट आदी वस्तुंची फेकाफेक केली. यावेळी फौजदार श्रीमती उमाप व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाद निर्माण होऊ नये म्हणून हस्तक्षेप करत अशा वस्तु फेकु नका अशा सुचना दिल्या. परंतु गोविंदांनी पोलिसांनाच विरोध करत त्यांच्याशी धक्काबुक्की केली. शासकिय कामात अडथळा निर्माण केला.

घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे आणि पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनीही घटनास्थळाला भेट दिली. दहीहंडी फोडल्यानंतर फौजदार सुवर्णा उमाप आपल्या पथकासह कंधारला आल्या. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांशी धक्काबुक्की व वाद घालणाऱ्या अंकुश मुसळे, अंगद जायभाये, माधव नारायण जायभाये, कोंडिबा जायभाये अशा चाळीस जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार मुलानी हे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: during dahihandi youngsters underwent misconduct with police