उपमहापौर विजय औताडेंसह चार नगरसेवकांना अटक, सुटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेत विरोध करणारे ‘एमआयएम’चे नगरसेवक सय्यद मतीन यांना भाजप नगरसेवकांनी शुक्रवारी (ता. १७) बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात भाजपचे उपमहापौर विजय औताडे व अन्य चार नगरसेवकांना सिटी चौक पोलिसांनी सोमवारी (ता. २०) अटक केली. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली, अशी माहिती पोलिस निरीक्षक दादासाहेब शिनगारे यांनी दिली. 

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सय्यद मतीन यांनी श्रद्धांजलीच्या प्रस्तावाला विरोध केला होता. त्यानंतर महापौरांसह भाजप नगरसेवक संतप्त झाले. दरम्यान, भाजपचे उपमहापौर विजय औताडे, भाजप गटनेते प्रमोद राठोड, नगरसेवक राजगौरव वानखेडे, रामेश्‍वर भादवे यांनी नगरसेवक मतीन यांना लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली; तसेच ॲड. माधुरी अदवंत यांनी त्यांना चपलेने चोप दिला होता. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात परस्परांविरोधी गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, मतीन यांना अठरा ऑगस्टला अटक झाली होती. मतीन यांच्या तक्रारीनुसार, सिटी चौक पोलिस ठाण्यात उपमहापौर विजय औताडे, प्रमोद राठोड, राजगौरव वानखेडे, रामेश्‍वर भादवे, माधुरी अदवंत यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. त्यानंतर भाजपचे उपमहापौर औताडे यांना मयूरपार्क भागातील संपर्क कार्यालयातून सिटी चौक पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्यानंतर उर्वरित संशयित नगरसेवकांना अटक झाली, त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली, अशी माहिती पोलिस निरीक्षक दादासाहेब शिनगारे यांनी दिली.

Web Title: Dy. Mayor amd corporator arrested and release