तलावात बुडून तिघींचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

मच्छिंद्रनाथ चिंचोली (ता. घनसावंगी) - येथील लघुसिंचन तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली, तर इतर तिघींना वाचविण्यात यश आले. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने काही मुली गटांगळ्या खाऊ लागल्या. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात सर्वच मुली बुडाल्या. यातील तिघींचा मृत्यू झाला. घनसावंगी परिसरात अग्निशामक दल नसल्याने मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी अंबड व परतूर येथून अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले.
Web Title: Dying in the lake and killing three

टॅग्स