esakal | कळमनुरीत ई- औषधी प्रणालीमुळे अत्यावश्यक औषधांचा तुटवडा कमी

बोलून बातमी शोधा

कोविड

कळमनुरीत ई- औषधी प्रणालीमुळे अत्यावश्यक औषधांचा तुटवडा कमी

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी (जिल्हा हिंगोली) : येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या कोविड समर्पित आरोग्य उपचार केंद्रात आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची दाखल होण्याची निरंतर प्रक्रिया पाहता या रुग्णांना औषधी कमी पडणार नाही. याकरिता वैद्यकीय अधिकारी यांच्याप्रमाणेच पॅरा मेडिकल विभागातील कर्मचाऱ्यांनी ई- औषधी प्रणालीचा उपयोग करुन रुग्णालयात औषधी साठ्याचे संतुलन राखले आहे.

येथील उपजिल्हा रुग्णालयांतर्गत असलेल्या कोविड समर्पित उपचार केंद्रामध्ये आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची निरंतर संख्या पाहता या रुग्णांना आवश्यक असलेली औषधी रुग्णालयात उपलब्ध असणे तेवढेच गरजेचे झाले आहे. औषधीचा तुटवडा व काही तांत्रिक अडचणीमुळे औषधी अभावी रुग्णांची होणारी गैरसोय पाहता येथील उपचार केंद्रामध्ये रुग्णांना लागणारी अत्यावश्यक औषधे कमी पडणार नाही. याची काळजी वैद्यकीय अधिकाऱ्याप्रमाणेच पॅरामेडिकल विभागामधील कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

हेही वाचा - रमजान विशेष : लैलतुल कदर पवित्र रात्रीची इबादतने रमजानच्या तिसऱ्या पर्वास प्रारंभ

या विभागातील कर्मचारी विलास बुद्रुक व कैलास भालेराव यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद मेने यांच्या देखरेखीखाली रुग्णालयात दाखल झालेली रुग्णसंख्या त्यांना अत्यावश्यक असलेली औषधी याचा नियमित ताळमेळ बसवून औषधी मागणीची पूर्तता केली जात आहे. येथील उपजिल्हा रुग्णालय हिंगोली येथून औषधीचा पुरवठा केला जातो. त्याकरिता राज्य शासनाच्या ई प्रणालीच्या वेबसाईट वर लागणाऱ्या औषधीची मागणी नोंदवून आवश्यक असलेल्या औषधीचा पुरवठा करवून घेण्यासंदर्भात पाठपुरावा केला जात आहे.

त्यामुळे रुग्णालयात आजाराच्या काळात औषधींचा तुटवडा निर्माण झाला नाही ई प्रणाली शिवाय वेळप्रसंगी स्थानिक स्तरावर उपलब्ध अनुदानातून औषधी खरेदी करण्याचा निर्णय घेत औषधीची खरेदी करण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालयाकडून रुग्णांची संख्या पाहता त्या तुलनेत औषधी साठ्याचे संतुलन राखल्या गेल्यामुळे रुग्णांना वेळेवर औषधी मिळत असल्याचे चित्र आहे. रुग्णालयात आज मितीस अत्यावश्यक असणारी औषधी यामध्ये एमपीएस इंजेक्शन, मेरोपेनाम, एल एम डब्ल्यू, इंजेक्शन रेमडेसीहीर, टॅबलेट फेबी पिरावीर इत्यादी औषधीचा साठा उपलब्ध आहे.

याशिवाय आजाराने बाधित असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लागणारी सुरक्षा साधनांचा समतोल बिघडणार नाही याची काळजी ही वैद्यकीय अधीक्षक व औषध निर्माण विभागातील कर्मचाऱ्यांनी घेतल्यामुळे रुग्णालयामधील रुग्ण संख्या व त्या तुलनेत अत्यावश्यक असलेली औषधी साठ्याच्या प्रमाणामध्ये संतुलन ठेवण्यात येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यश मिळवले आहे. त्यामुळे आजपर्यंत रुग्णांना देण्याकरिता आवश्यक असलेले औषधीचा तुटवडा निर्माण झाला नाही हे विशेष.

संपादन- प्रल्हाद कांबळे