शिक्षण हे ब्रह्मास्त्र : प्रल्हाद होगे पाटील

झरीला संविधान दिन उत्साहात.
Marathwada
Marathwadasakal

परभणी : पुरातन काळात देवदेवतांचे सर्वो्च शस्त्र म्हणून  ब्रह्मास्त्राची ओळख होती.आता मात्र  सध्याच्या डिजिटल युगामध्ये जर तुमच्याकडे शिक्षण असेल तरच तुमची ओळख आहे.त्यामुळे शिक्षण हेच खरे ब्रह्मास्त्र होय असे मत नगररचना विभागाचे अभियंता आणि झरी या गावचे भुमीपुत्र  प्रल्हाद होगे पाटील यांनी व्यक्त केले.

झरी ता.परभणी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने जिल्हा परिषद प्रशाला येथे  संविधान दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि.26)  शिक्षण ही काळाची गरज या संकल्पनेतून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक करण्यात आले. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून होगे पाटील बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी माजी सरपंच  गजानन देशमुख,झरीचे सरपंच दिपकराव देशमुख, तंटामुक्तीचे अध्यक्ष ब्रह्मानंद सावंत, विविध कार्य सोसायटी चेअरमन अशोक घुले, ज्ञानदीप विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पंडित, जिल्हा परिषद शाळेचे अपसिंगेकर,बाबाराव बोबडे पाटील विद्यालयाचे रंगनाथ राठोड,दत्तराव जगाडे, महेश मठपती, योगेश शिरडकर, अश्विनी सावंत आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

Marathwada
'विठ्ठल' निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी मेळाव्याला आले महत्त्व

यावेळी बोलताना होगे पाटील म्हणाले, शिक्षण म्हणजे ब्रह्मास्त्र पूर्वीच्या काळी लोकांची ओळख त्यांच्या मालमत्तेवर नुसार होत होती परंतु सध्याच्या डिजिटल युगामध्ये जर तुमच्याकडे शिक्षण असेल तरच तुमची ओळख निर्माण होत असते. माझे शिक्षण कठीण काळामध्ये झाले. मी याच शाळेत शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्त्यानंतर अकरावी बारावी सायन्स कॉलेज नांदेड या ठिकाणी शिक्षण घेतले. मी जर तेव्हा मेहनत केली नसती तर आज हे दिवस पाहायला मिळाले नसते. आपला मुलगा काय करतो याकडे आपण लक्ष दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले. आपण आपल्या पाल्यास पुढील उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात किंवा विदेशात डॉक्टर इंजिनिअर किंवा उच्च अधिकारी होण्यासाठी आपली पाठवण्याची तयारी ठेवावी लागेल. आपली मुले शिकली नाही तर भविष्यात कसे राहतील? भविष्यात व्यसनाधीनतेच्या आहारी गेले तर त्यांचे जबाबदारी कोणावर राहील. असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

Marathwada
NCP उमेदवाराच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन उपाध्यक्षांचा राजीनामा

यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्रह्मानंद सावंत यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश  मठपती यांनी केले तर आभार प्रदर्शन ब्रह्मानंद सावंत यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com