शिक्षणाची झाडाझडती! शिक्षणाधिकाऱ्यांचा थेट वाडी, वस्तीवर दौरा

ऑफलाईन वर्ग
ऑफलाईन वर्ग

जालना : जिल्ह्यातील (Jalna) शाळांमधून चालू असलेली ऑनलाइन-ऑफलाइन शिक्षणाची परिणामकारकता थेट वाडी, वस्तीवर अचानक भेट देवून तपासणी करण्यात आले. शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ (School In Jalna) यांनी मंगळवारी (ता.२७ ) अचानक गाव,वाडी वस्तीवर जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली,हे विशेष. दीड वर्षांपासून कोरोना संसर्गजन्य (Corona Infection) परिस्थितीने शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाले आहे.यामुळेच मागील वर्षात शैक्षणिक कामकाज ऑनलाइन सुरु होते. यंदाचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरुवात झाली आहे परंतु आठवी ते बारावीपर्यंत वर्ग सुरु झाले आहेत. तर दुसरीकडे पहिली ते सातवीचे वर्ग ऑनलाइन (Online Education) सुरु आहेत. जिल्ह्यातील शाळांमधून सुरु असलेले ऑनलाइन शिक्षण खरेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले का, याची परिणामकारकता तपासण्यासाठी शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी गावांना भेटी देवून,पालकांच्या घरी जात मुलांना विचारणा करीत परिस्थिती जाणून घेतली.शिक्षणाधिकारी यांच्यासमवेत उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांचे पथक होते.(education officer inspects online offline classes in jalna glp88)

ऑफलाईन वर्ग
शिवसेनेचे माजी महापौर राजेंद्र जंजाळांविरोधात गुन्हा दाखल

या पथकाने जालना तालुक्यातील वखारी, नाव्हा, साळेगावला भेटी दिल्या.थेट विद्यार्थ्याच्या घरी जाऊन पालकांशी चर्चा करीत परिस्थिती जाणून घेतली.ग्रामीण भागातील ऑनलाइन , ऑफलाईन शिक्षणाची स्थिती प्रत्यक्ष घरोघरी जाऊन जाणून घेतली. घरोघरी जात मुलांना अभ्यासात सातत्य निर्माण करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले.ऑनलाइन शिक्षणात अनेक अडचणी येत असल्याचे पालकांनी शिक्षणाधिकारी यांना सांगितले.मुलांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना अध्ययनात मदत करणे आवश्यक असल्याचे या वेळी पथकातील सदस्यांनी सांगितले. ग्रामीण भागात विद्यार्थी पालकांच्या अडचणी व समस्या जाणून घेत शिक्षकांनी परिणामकारकता टिकवून ठेवण्यासाठी विशेष शैक्षणिक नियोजन करण्यात यावेत,अशा सूचनाही शिक्षकांना देण्यात आल्या.

ऑफलाईन वर्ग
कन्नड तालुक्यात घराची भिंत अंगावर पडून दोघांचा मृत्यू

ग्रामीण भागातील शाळांबाबत परिस्थिती पाहत तपासणी करण्यात आली.विद्यार्थी, पालकांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन अडचणी व समस्या कोणत्या याची माहिती घेतली.शिक्षकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षण प्रभावीपणे राबविण्यात यावे,यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.

कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी, जालना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com