उस्मानाबाद जनता बँकेची निवडणूक ; भाजपा गटाचा पराभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

osmanabad

उस्मानाबाद जनता बँकेची निवडणूक ; भाजपा गटाचा पराभव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : उस्मानाबाद जनता बँकेची २० वर्षांनंतर निवडणूक झाली. शनिवारी (ता. २०) झालेल्या मतमोजणीमध्ये नागदे-मोदाणी गटाला मतदारांनी स्पष्ट कौल दिला तर भाजपच्या गटाला नाकारले. साधारण पंधरा टक्केसुद्धा मतदान भाजप गटाला पडले नाही.

भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मोठ्या प्रतिष्ठेची केलेली ही निवडणूक अगदी एकतर्फी जिंकत मोदाणी-नागदे गटाने धक्का दिला. जनता बँकेवर वीस वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडणुकीची वेळ आली होती. विरोधकांनी बँकेच्या व विद्यमान कारभाऱ्यांविरोधात रान पेटविण्याचा प्रयत्न केला. पण, मतदारांनी त्यांना अजिबात स्थान दिले नाही.

जनता बँकेची स्थापना करणाऱ्या ब्रिजलाल मोदाणी आणि वसंतराव नागदे या गटाची बँकेवरील पकड अत्यंत मजबूत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भाजप नेत्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर या निवडणुकीचे चांगलेच वातावरण निर्माण झाले होते. भाजप नेत्यांनी जोरकसपणे प्रचार केला तरीही मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखविला नसल्याचे पहिल्या फेऱ्यांच्या निकालावरून स्पष्ट झाले होते. दुसऱ्या फेरीनंतर तर ९० टक्केच्या आसपास मतदान घेऊन मोदाणी-नागदे गटाने विजयावर शिक्कामोर्तब केले होते. सहकारातील अत्यंत चांगले युनिट म्हणून या बँकेकडे पाहिले जाते. मराठवाड्यात ही महत्त्वाची बँक आहे. या बँकेत आतापर्यंत राजकारणाचा शिरकाव झालेला नव्हता. सर्वच पक्षाचे लोक एकत्र येऊन ही बँक सुस्थितीत राहिली पाहिजे या भावनेतून बँकेच्या संचालक मंडळांना बिनविरोध निवडून देत होते. यंदा मात्र ती परंपरा मोडीत निघाली.

उस्मानाबाद तालुका मतदारसंघ

विनोद गपाट- २,६६४

आशिष मोदाणी- १७,६८०

पिराजी मंजुळे - २,५२२

वसंत नागदे -१७,४१८

सुधीर पाटील - २,६१७

विश्वास शिंदे -१७,०४३

हेही वाचा: दोन वर्षापासून जबरदस्ती बलात्कार करणाऱ्यावर पोलीसात गुन्हा

उर्वरित जिल्हा मतदारसंघ

तानाजी चव्हाण - १७,६८९

सुभाष गोविंदपूरकर - १७,६३१

प्रदीप जाधव पाटील - १७,४६७

विकास कोंडेकर - २,५८३

सिद्धेश्वर पाटील - २,२८३

महादेव लोकरे-२५३९

उस्मानाबाद बाहेरील (राज्य)

अभिषेक आकणगिरे - २,४६५

निवृत्ती भोसले - १७,६५१

दिलीप देशमुख - २,४९६

सुभाष धनुरे - १७,२९९

नितीन कवठेकर - २,३३१

वैजीनाथ शिंदे - १७,३४९

हेही वाचा: दोन वर्षापासून जबरदस्ती बलात्कार करणाऱ्यावर पोलीसात गुन्हा

महाराष्ट्र राज्याबाहेरील

सीताराम जाधव - २,५८२

नंदकुमार नागदे - १८,४६३

आर्थिक दुर्बल

पांडुरंग धोंगडे - १,५१२

राजीव पाटील - १८,८४७

अनुसूचित जाती-जमाती

यशवंत पेठे - २,७०८

हरी सूर्यवंशी - १८,३४८

महिला मतदारसंघ

सुचिता काकडे - २,७७०

करुणा पाटील - १८,०४७

सरिता शिंदे - २,७०३

पंकजा पाटील - १७,७३०

loading image
go to top