महाविकास आघाडीच्या उमेदवाराची वंचितने वाढवली डोखेदुखी

Elections for the Aurangabad graduate constituency will be held on December 1
Elections for the Aurangabad graduate constituency will be held on December 1

हिंगोली :  औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची निवडणूक एक डिसेंबरला होत असल्याने या निवडणुकीत वंचित आघाडीने उमेदवार निवडणूक मैदानात उतरविल्याने महाविकास आघाडीची डोखेदुखी बनली आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची निवडणूक एक डिसेंबरला होत असल्याने सध्या जिल्ह्यात निवडणुकीचे वातावरण कोरोना काळात चांगलेच तापले आहे. पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीने सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यापाठोपाठ वंचित आघाडीने देखील प्रा. नागोराव पांचाळ यांच्या रूपाने तगडा उमेदवार निवडणूक मैदानात उभा केल्याने महाविकास आघाडीची चांगलीच डोखेदुखी वाढली असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीने आमदार सतीश चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर भाजप व आरपीआय आठवले गट, रासप यांनी महायुतीच्या शिरीष बोराळकर यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तसेच वंचित आघाडीने देखील प्रथमच पदवीधर मतदार संघात प्रा.नागोराव पांचाळ यांच्या रूपाने तगडा उमेदवार उतरविल्याने महाविकास आघाडी समोर तगडे आव्हान उभे आहे. याच बरोबर इतर अपक्ष उमेदवार देखील आपले नशीब अजमावण्यासाठी निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात १६ हजार मतदार संख्या असून पूर्ण विभागात दोन लाखाच्यावर मतदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत वंचित आघाडीची मते कोणाच्या पथ्यावर पडणार आहेत, या निवडणुकीत कळणार आहे.

पदवीधर मतदार संघ हा कोण्या एका पक्षाचा किंवा गटाचा गड राहिला नाही, या मतदार संघात पूर्वी भाजपचे वर्चस्व होते. त्यानंतर हा मतदार संघ पुन्हा राष्ट्रवादीकडे झुकला यापूर्वी भाजपकडून जयसिंगराव गायकवाड यांनी दोन वेळेस मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले, त्यानंतर श्रीकांत जोशी यांनी देखील एकदा प्रतिनिधित्व केले. त्यानंतर मात्र हा मतदार संघ राष्ट्रवादीकडे आला, मागील निवडणुकीत सतीश चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा पराभव करीत दुसऱ्यांदा विधानपरिषदेत पोहचले. यापूर्वी त्यांनी आमदार श्रीकांत जोशी यांचा पराभव केला होता.

२०२० च्या पदवीधर निवडणुकीत वंचित आघाडीने उमेदवार उभा केला आहे. दोन दिवसांपूर्वी ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी हिंगोलीत पत्रकार परिषद घेऊन विभागात झंझावात सुरु केला असल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांची पायाखालची वाळू घसरली आहे. प्रा.नागोराव पांचाळ यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. वंचित आघाडीचे कार्यकर्ते तन, मन धनाने प्रचारात लागले असून प्रचारात आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सहविचार सभेचे आयोजन केले होते. तर शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ माजीमंत्री संभाजी पाटील निलगेकर यांनी बैठक घेतली आहे.

आजघडीला औरंगाबाद पदवीधर मतदार संघात तिरंगी लढत निर्माण झाली असून यात महाविकास आघाडीतील युवा जिल्हा प्रमुख दिलीप घुगे देखील अपक्ष निवडणूक लढवीत असल्याने याचा फटका महाविकास आघाडीतील उमेदवाराला बसणार आहे. दिलीप घुगे यांनी मागील दोन वर्षापासून निवडणुकीची तयारी केली असून विभागात प्रचार दौरे सुरु केले. त्याच्या प्रचार सभेला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी समोर फार मोठे कडवे आव्हान उभे आहे. त्याच बरोबर वंचित आघाडीने देखील उमेदवार निवडणूक रिंगणात उभा केल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न अद्यापपर्यंत महाविकास आघाडीच्या आमदारांनी अद्याप सोडविले नसल्याने शाळा कृती संघटनेची तीव्र नाराजी सतीश चव्हाण यांच्यावर आहे. शाळा कृती समितीने केला असून मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय देखील घेतला आहे. विना अनुदानित प्राध्यापक वर्गाचे अनेक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, सोडविण्यासाठी आजपर्यंत आमदार यांनी प्रयत्न केले नाहीत, असा आरोप केला जात आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com