Latur : वीज बिल भरावे लागेल एकरकमी ; सामान्य ग्राहकांसाठीची टप्पा पद्धत महावितरणकडून बंद

शहर व जिल्ह्यात सामान्य ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी दिलेली टप्पा (हप्ता) सवलत महावितरणने आता बंद केली आहे. त्यामुळे एक फेब्रुवारीपासून अशा ग्राहकांना पतसंस्था, बँका, तसेच इतर खासगी केंद्रांत एकरकमी बिल भरणा करावा लागत आहे.
Latur
Latur sakal

लातूर : शहर व जिल्ह्यात सामान्य ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी दिलेली टप्पा (हप्ता) सवलत महावितरणने आता बंद केली आहे. त्यामुळे एक फेब्रुवारीपासून अशा ग्राहकांना पतसंस्था, बँका, तसेच इतर खासगी केंद्रांत एकरकमी बिल भरणा करावा लागत आहे. मार्चअखेर असल्याने आता सर्वच विभाग वसुलीवर भर देताना दिसत आहेत. त्यात महावितरणचाही समावेश आहे. यात मोठ्या ग्राहकांवर अधिक लक्ष दिले जात आहे.

थकबाकी न भरणाऱ्यांचा पुरवठा खंडित केला जात आहे. दरम्यान, दरमहा हजार- दोन हजार वीजबिल भरू न शकणाऱ्या सामान्य, गरीब ग्राहकांसाठी महावितरणने टप्पा पद्धतीची सवलत दिली होती. ग्राहक संबंधित अधिकाऱ्यांकडून भरणा रकमेचे टप्पे पाडून घेत असत. त्याचा अनेक ग्राहक फायदा घेत होते. हाती पैसे येतील तसे ते बिलाचा भरणा करत होते. यातून थकबाकी वाढत असल्याचे महावितरणच्या लक्षात आले आहे.

थकबाकीचा आकडा वाढतच गेला तर तो ग्राहकांसाठीही त्रासाचा आणि वसुलीसाठी महावितरणला कसरतीचा होईल, हे लक्षात आल्यावर फेब्रुवारीपासून टप्पा पद्धत बंद केली आहे. शहर व जिल्ह्यात पतसंस्था, सहकारी बँकांसोबतच इतर अनेक खासगी वीज बिल भरणा केंद्रे आहेत. तेथील ही पद्धत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना एकरकमी वीजबिल भरणा करावा लागत आहे.

Latur
Latur : लातूरला हिंदू जनआक्रोश मोर्चा ; वलांडीतील अत्याचाराच्या घटनेचा निषेध, बालिकांच्या हस्ते निवेदन

सामान्य ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच टप्पा पद्धत कार्यरत होती. याचा पाच ते दहा टक्के ग्राहक फायदा घेत होते. पण थकबाकी वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर पतसंस्था, सहकारी बँका, तसेच इतर खासगी केंद्रांतून दिली जाणारी ही पद्धत बंद करण्यात आली आहे.

- धनंजय पवार, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, लातूर परिमंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com