esakal | नदीतील पाण्यात मासेमारी करताना विजेचा धक्का लागून दोघा तरुणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity Shock

नदीतील पाण्यात विद्युत प्रवाह सोडुन मासे पकडत वीजेचा धक्का लागून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. १२) रात्री किल्लेधारूर तालुक्यातील कावळ्याचीवाडी येथे घडली.

नदीतील पाण्यात मासेमारी करताना विजेचा धक्का लागून दोघा तरुणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

किल्लेधारूर (जि.बीड) : नदीतील पाण्यात विद्युत प्रवाह सोडुन मासे पकडत वीजेचा धक्का लागून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. १२) रात्री किल्लेधारूर तालुक्यातील कावळ्याचीवाडी येथे घडली. समाधान सहदेव रुपनर (वय २३) व दीपक मारुती रुपनर (वय २२, दोघेही, रा. कावळ्याचीवाडी, ता. धारुर) अशी मृत तरुणांची नावे आहेत. तालुक्यातील कावळ्याचीवाडी येथे गावानजीक नदीत भरपूर मासे आहेत. तरुण वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करुन मासेमारी करतात.

Lakshmi Puja Muhurat : आज लक्ष्मीपूजन; घरोघरी लगबग, व्यापाऱ्यांचे चोपडीपूजन

वाहत्या पाण्यात ब्लिचींग पावडर, लिक्विड क्लोरीन टाकुन मासेमारी सोबतच नदीत विजेचा प्रवाह सोडून मासेमारी करण्याचा जीवघेणा प्रकारही तरुण करतात. दरम्यान, गुरुवारी रात्री अंधार पडल्यानंतर समाधान सहदेव रुपनर व दीपक मारुती रुपनर यांनी नदीपात्रात विद्युत प्रवाह सोडून मासेमारी सुरु केली. मात्र, याच विद्युत प्रवाहाने या दोघांचाही मृत्यू झाला. अंधार पडला असताना दोघे घरी परत आले नसल्याने शोध घेत असताना सदरील प्रकार उघड झाला आहे. तरुणांच्या मृतदेहांची उत्तरीय तपासणी येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. 

Edited - Ganesh Pitekar