esakal | रेल्वेतही आता इलेक्ट्रोनिक फंड ट्रान्सफरची सुविधा
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

डिजिटल इंडिया मोहिमे अंतर्गत तिकीट तपासनिकास सुद्धा पीओएस मशीन देण्यात आल्या.

रेल्वेतही आता इलेक्ट्रोनिक फंड ट्रान्सफरची सुविधा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत भारतीय रेल्वेमध्ये सर्वत्र पीओएस मशीन म्हणजेच पोइन्त ऑफ सेल मशीनचा वापर सुरु करण्यात आला आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरची सुविधा उपलब्ध झाली आहे. परंतु प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान म्हणजेच रेल्वे गाड्यांमध्ये पैसे भरतांना ही सुविधा उपलब्ध नव्हती.

नांदेड विभागातील ५० तिकीट तपासणिकास पी.ओ.एस. मशीन

नांदेड रेल्वे विभागात वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिवाकर बाबू यांनी शुक्रवारी (ता. १३) मार्चपासून दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील ५० तिकीट तपासणिकास पी.ओ.एस. मशीन उपलब्ध करून दिल्या. जेणेकरून रेल्वे प्रवाशी आपल्या प्रवासा दरम्यान रेल्वे गाडीमध्ये टी.सी. ला विविध कारणाकरिता जसे विना तिकीट प्रवासाचा दंड, चुकीच्या तिकिटावर प्रवास केल्यामुळे लागणारा दंड, लगेज तिकीट इत्यादी करिता आपले  ए.टी.एम. किंवा क्रेडीट कार्ड वापरून पैसे भरू शकतात. ही इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरची सुविधा उपलब्ध केल्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. हे टी.सी. रेल्वे गाडीमधेच प्रवाशांना त्यांनी भरलेल्या पैशाची पी.ओ.एस. मशीनमधून निघालेली छापील पावती  देतील. 

हेही वाचा - PHOTOS : हिंदू-मुस्लिम एकता जोपासणारा ‘क्लब’, कोणता? ते वाचाच

नांदेड विभागाच्या सर्व रेल्वेगाड्यात सुविधा

वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिवाकर बाबू पुढे म्हणाले की, लवकरच नांदेड विभागातील बाकीच्या टीसीना सुद्धा पी.ओ.एस. मशीन देण्यात येतील जेणेकरून ही इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरची सुविधा सर्व रेल्वे गाड्यांमध्ये उपलब्ध होईल.

रेल्वेचे प्रशिक्षीत कर्मचारी

या पी.ओ.एस. मशीन वापरण्याचे आणि त्यांचा हिशोब ठेवण्याचे प्रशिक्षण भारतीय स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी नांदेड विभागातील तिकीट तपासणिकास दिले, त्या बद्दल रेल्वे प्रशासनाने भारतीय स्टेट बँकेचे आभार मानले आहेत.
 

loading image