अकरा दिवसांनंतर हरभरा खरेदी केंद्र सुरु

उमेश वाघमारे
रविवार, 27 मे 2018

साठवणुकीस जागा नसल्याने नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र बंद असल्याचे वृत्त 'सकाळ'ने दिल्यानंतर हरभरा साठवणुकीसाठी वखार महामंडळाने सोय करुन दिली आहे.

जालना - वखार महामंडळाचे गोदामात जागा फूल असल्याने अकरा दिवसांनंतर जालना येथील नाफेड चे हरभरा खरेदी केंद्र रविवारी (ता. 27) सुरु झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर हरभरा घेऊन मोठी गर्दी केली आहे. दरम्यान साठवणुकीस जागा नसल्याने नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र बंद असल्याचे वृत्त 'सकाळ'ने दिल्यानंतर हरभरा साठवणुकीसाठी वखार महामंडळाने सोय करुन दिली आहे.

वखार महामंडळाचे गोदाम फुले झाल्याने ता. 15 मेपासून जालना येथील नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र बंद आहे. याबाबत 'सकाळ'ने सातत्याने वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे वखार महामंडळाने सिटी वेअर हाऊस येथे हरभरा साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. परिणामी अकरा दिवसांनंतर रविवारी (ता. 27) जालना येथील नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र सुरु झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्रावर हरभरा विक्रीसाठी मोठी गर्दी केली होतो. दरम्यान ता. 29 मे ला नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र बंद होणार आहेत. त्यामुळे हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्रावर गर्दी करण्यास सुरवात केली आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Eleven days later the gram Purchase center started

टॅग्स