esakal | इसापुर धरणाचे अकरा दरवाजे उघडले, धरणाखालील गावांना सावधानतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील इसापुर धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक पाहता गुरुवारी (ता.१७) धरणाचे अकरा दरवाजे ५९ सेंटिमीटरने उघडून ५३२.०९० क्युमेक्स अतिरिक्त पाण्याचा पैनगंगा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे.

इसापुर धरणाचे अकरा दरवाजे उघडले, धरणाखालील गावांना सावधानतेचा इशारा

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

कळमनुरी (जिल्हा हिंगली) : इसापुर धरणामध्ये शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक पाहता गुरुवारी (ता.१७) धरणाचे अकरा दरवाजे ५९ सेंटिमीटरने उघडून ५३२.०९० क्युमेक्स अतिरिक्त पाण्याचा पैनगंगा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे.

इसापूरच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी वाशिम, बुलढाणा, मेहकर परिसरात झालेला पाऊस पाहता धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. रविवारपासून धरणाच्या दोन दरवाजामधून नियमित पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सद्यस्थितीत इसापूरच्या वरच्या बाजूला असलेले सर्व अकरा बंधारे व पेणटाकळी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. यामधील विदर्भाच्या सीमेवरील सागद येथील धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील जयपुर बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. बुधवारी सायंकाळपासून जयपुर बंधाऱ्याच्या बारा दरवाजांपैकी तिन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी इसापुर धरणात येत आहे. या जलाशयात येत आहे, त्यामुळे पन्नास सेंटिमीटरने उघडे असलेल्या दोन दरवाजांची संख्या वाढवून ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प प्रशासनाने गुरुवारी धरणाची एकूण अकरा दरवाजे ५० सेंटिमीटरने उघडून पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

हेही वाचामराठवाडा (हैदराबाद) मुक्तीसंग्रामाचा दैदिप्यमान लढा...

जयपुर बंधाऱ्याच्या बारा दरवाजांपैकी तिन दरवाजे उघडले

बुधवारी सायंकाळपासून जयपुर बंधाऱ्याच्या बारा दरवाजांपैकी तिन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी इसापुर धरणात येत आहे. या जलाशयात येत आहे, त्यामुळे पन्नास सेंटिमीटरने उघडे असलेल्या दोन दरवाजांची संख्या वाढवून ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प प्रशासनाने गुरुवारी धरणाची एकूण अकरा दरवाजे ५० सेंटिमीटरने उघडून पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

 
येथे क्लिक करा  - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची गरुडभरारी

धरणाची पाणीपातळी ४४१ मीटर

सद्यस्थिती धरणाची पाणीपातळी ४४१ मीटर आहे. तर एकूण पाणीसाठा १२७९.०६३१ दलघमी असून उपयुक्त पाणीसाठा ९६४.०९९४ दलघमी एवढा आहे. त्यामुळे धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. दरम्यान, धरणातील पाणीसाठ्याची येणारी आवक पाहता दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात येइल, असे सांगण्यात आले. या परिसरात पाणीसाठा पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.  


संपादन ः राजन मंगरुळकर