माळेगावात अकरा लाखांचा घोडा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 जानेवारी 2019

नांदेड - चारचाकी लक्‍झरियस वाहनांच्या किमतीलाही लाजवेल असा अकरा लाखांचा घोडा व विविध महागडे प्राणी पाहायचे असतील तर माळेगावची (ता.लोहा) यात्रा गाठावी लागेल. दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या या यात्रेला नुकतीच सुरवात झाली आहे. देशपातळीवरील जनावरांचा बाजार व भटक्‍याविमुक्त- धनगर आदी समाजांच्या दृष्टीने तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसाठी देश व राज्यभरातून लोक येत आहेत.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शासकीय महापूजा होऊन यात्रेची सुरवात झाली. त्यानंतर पारंपरिक पालखी सोहळा व देवस्वारी झाली. राज्यभरातून आलेल्या यात्रेकरूंनी पारंपरिक विधी सोहळ्यात बेल, खोबरे व भंडाऱ्याची उधळण करत आराध्यदैवत खंडोबाला साकडे घातले. ही यात्रा उत्सव, भक्तिभावासह जागृती, परंपरेचा संगम आहे. पशुप्रदर्शन हे या यात्रेचे खास आकर्षण आहे. 

राज्यभरातील विविध प्रजातींच्या पशूंसह अश्‍व, परप्रांतीय उंट, गर्दभ, श्‍वान, खेचरांच्या बाजारातून कोट्यवधींची उलाढाल होते. स्थानिक वाण असलेल्या लालकंधारी, देवणी, खिल्लार जनावरांसह कुक्कुट, बदक, मांजर, तितर आदी पक्ष्यांचे प्रदर्शन यात्रेकरूंसाठी आकर्षण ठरले. हौशी अश्‍वपालक गोपाळ रंगबाळ (जि.वाशीम) यांची अकरा लाख रुपये किमतीची ‘रेश्‍मा’, जिल्ह्यातील किवळा येथील अकरा लाखांचा ‘बादल’अश्‍वप्रदर्शनाचे आकर्षण ठरले.

राजस्थान, मध्य प्रदेशातून महिनाभराचा प्रवास करून माळेगाव यात्रेत दाखल झालेल्या उंटांना चांगली मागणी आहे. उंट सवारीसह मधुमेहावर गुणकारी असलेल्या मादी उंटाच्या दुधाला मागणी वाढत असल्याने यंदा परप्रांतीय उंटाची संख्या वाढली आहे.

गर्दभ बाजार फुलला
पश्‍चिम महाराष्ट्रातील मढीच्या तुलनेत माळेगाव यात्रेमध्ये शनिवारी गर्दभ, खेचर बाजार फुलला होता. गर्दभ जोडीला पंचवीस हजार रुपये सर्वाधिक बोली लावण्यात आली. राज्यभरातील विविध प्रजातींचे श्‍वान यात्रेतील बाजारामध्ये दाखल झाले आहेत. आगळा वेगळा आफ्रिकन श्‍वान व चायनीज मांजर शनिवारी यात्रेकरूंचे आकर्षण ठरले.

Web Title: Eleven lakh Rupees Horse rate in malegaon yatra