अकरा तलाव ओसंडून वाहतायत, पाणीटंचाईचा प्रश्‍न सुटणार

Pond In Jalkot
Pond In Jalkot

जळकोट (जि.लातूर) : मागील सहा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अकरा साठवण तलाव पूर्ण भरुन ओसंडून वाहत आहेत. मागील पंधरा दिवसांपूर्वी पडलेल्या पाऊसामुळे बारापैकी दहा साठवण तलाव भरले होते. त्यानंतर परतीच्या मुसळधार पावसाने सर्वच साठवण तलाव ओसंडून वाहत आहेत. परतीच्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान केले आहे. मात्र पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ओलिताखालील क्षेत्र वाढू शकते. शिवाय पाणीटंचाईचा प्रश्नही मिटणार आहे.

जळकोट तालुक्यातील भरलले तलाव असे; कंरजी, जंगमवाडी, रावणकोळा, हाळदवाढवणा, सोनवळा, डोंगरकोनाळी, चेरा एक व चेरा दोन, हावरगा, ढोरसांगवी आदि तलाव शंभर टक्के, तर केंकतसिदगी तलाव साठ टक्के भरला आहे.
तालुक्यातील साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले असल्याने याचा फायदा रब्बी पिकाला होणार आहे. तालुक्यात गेल्या वर्षी पाऊस जास्त असल्याने नऊशे हेक्टरवर शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली होती.

या वर्षीही पावसाचे साठवण जास्त असल्याने पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होणार आहे. जळकोट तालुका डोंगराळ भाग म्हणून ओळखला जातो, पंरतू पावसाने दोन वर्षापासून साथ दिल्याने डोंगराळ भाग ऊस लागवडीमुळे हिरवागार झाला आहे. तालुक्यातील अनेक साठवण तलावावर गावच्या पाणीपुरवठा योजना आहे. साठवण तलावात पाणीसाठा उपलब्ध असल्याने येणाऱ्या वर्षात अनेक गावांना होणारी पाणीटंचाई दूर होणार आहे. दरवर्षी शासनाचा पाणीपुरवठ्यासाठी होणारा लाखो खर्च वाचणार असून प्रशासनाची दमछाक होणार नाही.


या वर्षी पाऊस भरपुर झाला आहे. खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन हातचे गेले आहे. साठवण तलावात पाणीसाठा चांगला असल्याने पाण्याचा रब्बी पिकाला फायदा होणार असून खरिपातील होणारा घाटा रब्बी पेरणीत भरुन निघेल.
बालाजी केंद्रे, शेतकरी, पाटोदा

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com