esakal | कुलगुरु लक्ष देणार का? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेचा घोळ सुरूच
sakal

बोलून बातमी शोधा

3srtmou_2

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेचा घोळ दुसऱ्या दिवशीही कायम असून शनिवारी (ता.१७) सकाळी साडेअकरा वाजता एलएलबीच्या अंतिम वर्षाची परीक्षा ठेवण्यात आली होती. त्याची ही प्रश्नपत्रिका तब्बल दोन तास विद्यार्थ्यांना मिळाली नाही.

कुलगुरु लक्ष देणार का? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेचा घोळ सुरूच

sakal_logo
By
प्रशांत शेटे

चाकूर (जि.लातूर) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेचा घोळ दुसऱ्या दिवशीही कायम असून शनिवारी (ता.१७) सकाळी साडेअकरा वाजता एलएलबीच्या अंतिम वर्षाची परीक्षा ठेवण्यात आली होती. त्याची ही प्रश्नपत्रिका तब्बल दोन तास विद्यार्थ्यांना मिळाली नाही.स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे.

तीन दिवसांपासून परीक्षेला सुरवात झाली असून विद्यापीठाकडून नियोजित वेळेत प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना तासन् तास ताटकळत बसावे लागत आहे. याबाबत सकाळमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला जाग आली असून शुक्रवारी (ता.१६) ज्या विषयाच्या परीक्षा झाल्या नाहीत.त्याची परीक्षा शनिवारी सकाळी ठेवण्यात आली. शनिवारी होणाऱ्या परीक्षा २८ आॅक्टोबर रोजी होतील असे पत्र परीक्षा विभागाकडून काढण्यात आले.

घुसखोरी केलेल्या दोन बांगलादेशींना कारावास, लातूरच्या महिलेशी होते संपर्कात

दुसऱ्या दिवशी कोणत्या विषयाच्या परीक्षा आहेत. त्याच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत की नाही याची खात्री करण्याची जबाबदारी परीक्षा विभागाची असतानाही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शुक्रवारच्या पुढे ढकलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका शनिवारी सकाळी साडेअकराला उपलब्ध झाली नाही. याबाबत विद्यार्थ्यांनी पुन्हा विद्यापीठाकडे तक्रार केल्यानंतर दुपारी दीड वाजता आॅनलाईन प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली. तीन दिवसांपासून प्रश्नपत्रिकेचा घोळ विद्यापीठाकडून सोडविला जात नसल्यामुळे कुलगुरूंनी याकडे लक्ष देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.


विद्यापीठाच्या परीक्षेत दररोज प्रश्नपत्रिका उपलब्ध होण्यासाठी उशीर होत आहे. आज एलएलबीच्या प्रश्नपत्रिका तब्बल दोन तास उशीरा मिळाली. यामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होत असून कुलगुरूंनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
पांडुरंग बुंदराळे, तालुकाप्रमुख युवा सेना, चाकूर

संपादन - गणेश पिटेकर