esakal | पोलिस मुख्यालयातच कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या 

बोलून बातमी शोधा

jitendra sali}

गोळीचा आवाज आल्याने सर्व कर्मचारी धावत घटनास्‍थळी आले असता पोलिस कर्मचारी जितेंद्र साळी यांचा मृतदेह आढळून आला. श्री. साळी यांच्या पश्वात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी आकस्‍मात मृत्‍यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी सांगितले.   

पोलिस मुख्यालयातच कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : येथील पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यानी शनिवारी (ता.२०) दुपारी तीनच्या दरम्यान स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्‍महत्‍येचे कारण मात्र समजू शकले नाही. 

हिंगोली पोलिस मुख्यालय येथे कार्यरत असलेले जितेंद्र साळी (वय ४०) हे शस्‍त्र विभागात कार्यरत होते. शनिवारी कर्तव्य बजावत असताना त्यांनी अचानक तीनच्या सुमारास रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. 

हेही वाचाबैलजोडी, बैलगाडीसह दांपत्य गेले वाहून -

घटनेचा पंचनामा सुरू 

या वेळी गोळीचा आवाज आल्याने सर्व कर्मचारी धावत घटनास्‍थळी आले असता श्री. साळी यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक योगेशकुमार, अतिरीक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस उपाधीक्षक रामेश्वर वैजने आदींनी घटनास्‍थळी धाव घेतली. या बाबत पंचनामा सुरू असल्याचे सांगण्यात आले. श्री. साळी यांच्या पश्वात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.  

आत्महत्येचे कारण तपासानंतरच समोर येणार

हिंगोली पोलिस दलातील जितेंद्र साळी हे मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचे होते. त्यांनी अनेक सामाजिक क्षेत्रांमध्ये सुद्धा चांगले काम केले होते. त्यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली हे मात्र समजू शकले नाही. याप्रकरणी आकस्‍मात मृत्‍यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी सांगितले. 

येथे क्लिक कराहिंगोली जिल्ह्यातील अकरा गावे ठरली हॉटस्‍पॉट -

वीज अंगावर कोसळून शेतकऱ्यासह बैलाचा मृत्‍यू

हिंगोली : अंगावर वीज पडून शेतकऱ्यासह बैलाचाही मृत्‍यू झाल्याची घडना कापडसिंगी (ता. सेनगाव) येथे शुक्रवारी (ता.१९) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
कापडसिंगी येथील शेतकरी उकंडी गिऱ्हे हे शेतात पेरणी करत असताना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता विजेच्या कडकडासह जोरदार पावसाला सुरवात झाली. 

कुटुंबीयावर शोककळा पसरली

या वेळी श्री. गिऱ्हे पेरणी करत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात त्यांचा जागेवरच मूत्यू झाला. तसेच त्यांच्या बैलावरही वीज कोसळल्याने बैलाचाही मृत्‍यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे. श्री. गिऱ्हे यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.