शेतकऱ्यांकडून अभियंत्यास धमकी, मारहाण

शेतकऱ्यांकडून अभियंत्यास धमकी, मारहाण

नांदेड : तलावासाठी अधिग्रहण केलेल्या शेतीचा योग्य माेबदला दिल्याशिवाय काम करू देणार नाही. असा पावित्रा घेऊन संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. 2) पाटबंधारे अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून जाळपोळ करण्याची धमकी दिली. शासकीय कामत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी साठ शेतकऱ्यांवर हिमायतनगर ठाण्यात गुरूवारी (ता. 3) सांयकाळी सातच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

हिमायनगर तालुक्यातील दरेसरसम शिवारात लघुपाटबंधारे विभागांतर्गत साठवण तलाव आहे. या तलावाचे देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू आहे. बुधवारी पाटबंधारे विभागाचे एक पथक या कामावर पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आमच्या जमिनीचा मोबदला आम्हाला मिळाला नाही. अगोदर दिलेला मोबदला कमी होता  तो आता वाढवून देण्यात यावा अशी मागणी करीत अधकिकाऱ्यांची गाडी अडविली. कनिष्ठ अभियंता पंकज शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनाच संतप्त सेतकऱ्यांच्या आक्रोशाला बळी पडावे लागले.

शेतकऱ्यांनी त्यांना धक्काबुक्की करून गाडीसह जाळपोळ करण्याची धमकी दिली. जर पुन्हा या कामावर आलात तर गाठ आमच्याशी आहे अशी धमकी दिली. तलावातील गाळ भरणीचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडून शासकिय कामात अडथळा निर्माण केला. यावरून अभियंता पंकज शिंदे यांच्या फिर्यादीवरुन हिमायतनगर ठाण्यात प्रमोद निळकेंद्रे (आंधेगाव), तुकाराम आतमवाड (मोठा पवना), तुकाराम आनमवाड (लहान पवना), लक्ष्मण गादेवाड (गुरकांडी), साईनाथ आनमवाड, श्रीराम येलकेवाड, सदाशिव राठोड सर्व रा. दरेसरसम, रंगराव राठोड, प्रभु केरबा राऊत (पवना), भिमा सोमला राठोड, सुभाष तुकाराम आनमवाड यांच्यासह इतर स्त्री व पुरूष अशा साठ लोकांविरूध्द गुन्हा दाखल झाला. तपास फौजदार काळे हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com