कोरोनाचा डर - ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरात  मास्क घालूनच प्रवेश करा

प्रा. प्रवीण फुटके 
शनिवार, 7 मार्च 2020

परळी वैजनाथ (जि. बीड) - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या येथील वैद्यनाथ मंदिरात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्यात येत असून, वैद्यनाथ मंदिरात दररोज परराज्यांतून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या भाविकांनी मंदिरात प्रवेश करताना तोंडाला मास्क किंवा स्कार्फ बांधूनच गाभाऱ्यात प्रवेश करावा, असे आवाहन वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टने केले आहे. 

काही दिवसांपासून देशात कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण आढळत आहेत. यामुळे देशासह राज्यात खबरदारी म्हणून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावेत, स्वच्छता अभियान राबविण्यात यावे, असे आवाहन शासनाने केले आहे.

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का?

राज्यातील सर्व मंदिरांत देवदर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करीत असतात. अशा ठिकाणी हा व्हायरस पसरण्याची शक्यता आहे म्हणून येथील वैद्यनाथ मंदिरात मास्क किंवा स्कार्फ बांधूनच प्रवेश करावा, असे आवाहन वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी केले आहे.

हेही वाचा - कोरोना विषाणू  येऊच नये म्हणून....

देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनाही मास्क वाटप करण्यात आले असून, स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन स्वच्छतेबाबत विशेष काळजी घ्यावी, अशा सूचनाही दिल्या आहेत. दर दोन तासाला मंदिर परिसर स्वच्छ करण्याचा आदेश देण्यात आलेला असून मंदिर परिसरात आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यासाठी जिल्हा रुग्णालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Enter the Jyotirlinga Vaidyanath Temple wearing a mask