कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रिया 13 पासून सुरु 

सुषेन जाधव
सोमवार, 11 जून 2018

औरंगाबाद : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत दहा विद्याशाखांमध्ये पदवी अभ्यासक्रम शिकविण्यात येतो. 12 वी विज्ञान आणि एमएचटी-सीईटी, जेईई, एआयईईए-युजी (भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडून घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परिक्षा) या सामायिक प्रवेश परिक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी घेतलेल्या गटानुसार पात्रता निश्‍चित करण्यात येणार आहे. 

औरंगाबाद : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत दहा विद्याशाखांमध्ये पदवी अभ्यासक्रम शिकविण्यात येतो. 12 वी विज्ञान आणि एमएचटी-सीईटी, जेईई, एआयईईए-युजी (भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडून घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परिक्षा) या सामायिक प्रवेश परिक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी घेतलेल्या गटानुसार पात्रता निश्‍चित करण्यात येणार आहे. 

187 महाविद्यालयांत 15 हजारांवर जागा 
या अभ्यासक्रमाची राज्यातील 187 महाविद्यालये सुरु आहेत. राहुरी विद्यापीठांतर्गत 71, अकोला विद्यापीठांतर्गत 36, परभणी विद्यापीठांतर्गत 54 आणि दापोली विद्यापीठांतर्गत 26 अशी विद्यापीठनिहाय महाविद्यालये आहेत. चार वर्षांच्या या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता 15 हजार 227 आहेत. यापैकी 31 महाविद्यालये शासकीय, दोन अनुदानित, 154 कायमस्वरुपी विनाअनुदान तत्त्वावरील आहेत. 

अशी असेल प्रवेशप्रक्रिया 
पदवी अभ्यासक्रमासाठी 11 जूनपासून प्रवेशाच्या ऑनलाईन प्रक्रियेस सुरवात झाली. ऑनलाईन प्रवेश अर्ज व आवश्‍यक ती स्कॅन केलेली कागदपत्रे 5 जुलैपर्यंत संकेतस्थळावर अपलोड करावी लागणार आहेत. 13 जुलैला http://www.dtemaharashtra.gov.in किंवा http://www.mcar.org किंवा maha-agriadmission.in या संकेतस्थळावर अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. 17 जुलैला ऑनलाईन आक्षेप नोंदविता येतील. 23 जुलैला वरील संकेतस्थळावर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.

पहिली प्रवेश वाटप फेरी

26 जुलैला सायंकाळनंतर पहिल्या प्रवेश फेरीच्या  वाटप याद्या प्रसिद्ध होणार असून 30 जुलैला सायंकाळी साडेपाचपर्यंत रिपोर्टिंगचा अंतिम वेळ असेल. 31 जुलैला पहिल्या प्रवेश वाटप फेरीअखेर रिक्त जागांचा तपशील प्रसिद्ध होतील.

दुसरी प्रवेश वाटप फेरी

3 ऑगस्टला सायंकाळनंतर दुसऱ्या प्रवेश फेरीच्या वाटप याद्या प्रसिद्ध होतील. याच्या रिपोर्टिंगसाठी सहा ऑगस्टला सायंकाळी साडेपाचपर्यंत अंतिम वेळ असेल. दुसऱ्या प्रवेश वाटप फेरीअखेर रिक्त जागांचा तपशील सात ऑगष्टला प्रसिद्ध होतील.

तिसरी प्रवेश वाटप फेरी

9 ऑगस्टला सायंकाळनंतर तिसऱ्या प्रवेश फेरीच्या वाटप याद्या प्रसिद्ध होतील. याच्या रिपोर्टिंगसाठी 13 ऑगस्टला सायंकाळी साडेपाचपर्यंत अंतिम वेळ असेल. तिसऱ्या प्रवेश वाटप फेरीअखेर रिक्त जागांचा तपशील 14 ऑगस्टला सायंकाळनंतर प्रसिद्ध होईल. 

चौथी प्रवेश वाटप फेरी
14 ऑगस्टला चौथ्या प्रवेश फेरीची वाटप यादी प्रसिद्ध होईल. याच्या रिपोर्टिंगसाठी 20 ऑगस्टला सायंकाळी साडेपाचपर्यंत अंतिम वेळ असेल. चौथ्या प्रवेश वाटप फेरीअखेर रिक्त जागांचा तपशील 20 ऑगस्टला प्रसिद्ध होईल.

ऑनलाईन प्रवेश वाटप फेरीद्वारे प्रवेशाचे वाटप निश्‍चित झालेल्या विद्यार्थ्यांना 16 ऑगस्ट  ते 21 ऑगस्ट दरम्यान संबंधित महाविद्यालयात मूळ कागदपत्रे, आवश्‍यक शुल्क भरावे लागेल. 22 ऑगस्टला स्पॉट ऍडमिशन फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील प्रसिद्ध होईल. 27 ऑगस्टला  वर्ग सुरु होतील. 10 सप्टेंबर ही प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारिख आहे

Web Title: The entrance of the Agricultural Degree course started from Wednesday