प्रशासनाच्या तत्परतेमुळे पर्यावरणाची टळली हानी

NND14KJP02.jpg
NND14KJP02.jpg

नांदेड : प्रशासन कोरोना साथरोग नियंत्रणात व्यस्त असताना जिल्ह्यातील हदगाव व तामसा या हद्दीत जंगलाला लागलेली आग जिल्हाधिकारी डॉ. विपीन, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी व निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या तत्परतेने तत्काळ नियंत्रणात आली. अन्यथा उन्हाळ्याच्या वाढत्या उष्णतेत या आगीने तांडव केले असते. तसेच राष्ट्रीय संपत्ती नष्ट झाली असती.

हदगाव व तामसा वनक्षेत्रात लागली आग
सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे जंगलातील झाडांचे घर्षण व वातावरणातील उष्णता यामुळे आग लागण्याचे प्रकार वाढतात. जिल्ह्यातील हदगाव वनपरिक्षेत्र व तामसा या हद्दीतील कॅम्प नंबर ३४७ (ए) येवली गावाजवळील जंगल क्षेत्रात सोमवारी (ता. १३) दुपारी आग लागली होती. पाहता-पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले होते. हा प्रकार नांदेड येथील आकाशवाणीचे पत्रकार आनंद कल्याणकर यांना कळाले. त्यांनी लगेच जिल्हाधिकारी कार्यालयात मीडिया कक्षात डॉ. दीपक शिंदे यांना हा प्रकार सांगितला. लवकर उपाय झाले तर बरे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. शिंदे यांनी हा प्रकार तातडीने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या लक्षात आणून दिला.

प्रशासनाच्या तत्परतेने आग आटोक्यात
जिल्हाधिकारी डॉ. विपीन, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना या साथ रोगाच्या नियंत्रणाच्या कामाच्या बैठका माहितीचे संकलन अशा विविध कामात व्यस्त असतानाही डॉ. खल्लाळ यांनी आगीवर नियंत्रण आले नाही, तर त्या परिसरातील अनेक झाडे जळून गेली असती तसेच राष्ट्रीय संपत्ती नष्ट झाली असती. सोबतच जंगलातील प्राणी, पशू-पक्षी यांची ही मोठ्या प्रमाणात हानी झाली असती या बाबींचे गांभीर्य ओळखून डॉ. खल्लाळ यांनी वन अधिकारी नांदेड, उपविभागीय अधिकारी भोकर तसेच इतर अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तत्काळ आग आटोक्यात आणण्यासाठी काय उपाय योजना करता येतील हे कळवा असे स्पष्ट आदेश दिले.

दोन ते तीन तासात मिळविले आगीवर नियंत्रण 
या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी  घटनास्थळी धाव घेतली. वन विभागातील शरयू रुद्रावार, वनपाल खूरसाळे व त्यांच्या इतर साथीदारांनी त्यांची यंत्रणा वापरत या आगीवर दोन ते तीन तासात नियंत्रण मिळवले. जागरूक पत्रकार, तत्पर अधिकारी व झटपट निर्णय यामुळे हे शक्य झाले व जिल्ह्यातील एका वनाचे व पर्यायाने पर्यावरणाचे संरक्षण झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com