सामाजिक सलोखा जपण्यासाठी मराठा, आंबेडकरवादी, डाव्या पक्ष-संघटना एकवटल्या 

योगेश पायघन
सोमवार, 8 जानेवारी 2018

औरंगाबाद : शहरात शांतता व जातीय सलोखा कायम रहावा व 'आरएसएस'च्या समजात फूट पडण्याच्या षडयंत्राविरोधात सोमवारी (ता.8) काढण्यात आलेल्या सद्भावना रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवराय ते भीमराय रॅलीचा समारोप भडकल गेट येथे दुपारी दोनच्या सुमारास झाला. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

औरंगाबाद : शहरात शांतता व जातीय सलोखा कायम रहावा व 'आरएसएस'च्या समजात फूट पडण्याच्या षडयंत्राविरोधात सोमवारी (ता.8) काढण्यात आलेल्या सद्भावना रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवराय ते भीमराय रॅलीचा समारोप भडकल गेट येथे दुपारी दोनच्या सुमारास झाला. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

मराठा, आंबेडकरवादी, डाव्या पक्ष संघटना एकवटून ही सद्भावना रॅली क्रांती चौक येथून सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास निघाली. अजबनगर, पैठणगेट, गुलमंडी, औरंगपुरा, खडकेश्वर मार्गे दुपारी दोन वाजेच्या सुमारास भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप झाला. यावेळी विविध मागण्यांच्या निवेदनाचे महिलांनी सामूहिक वाचन केले. राष्ट्रगीताने रॅलीची सांगता झाली.

या रॅलीमध्ये खालील मागण्या मांडण्यात आल्या :

  • कोंबिंग मध्ये पोलिसांनी केलेल्या नुकसानीची भरपाई मिळावी
  • पोलिसांनी तरुण, महिला, वयोवृद्धांवर केलेल्या अमानुष मारहाणीत जखमी केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे
  • महाराष्ट्र बंदच्या काळात आंबेडकरी तरुणांवर दाखल गुन्हे मागे घ्यावे
  • आष्टी येथील मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याच्या (फटांगडे) कुटुंबाला तीस लाखाचे अर्थसाह्य करावे

सहभागी संघटना
संभाजी ब्रिगेड, बळीराजा संघटना, राष्ट्रीय मराठा महासंघ, स्वाभिमानी अखिल भारतीय छावा, शिवक्रांती संघटना, भारतीय कम्युनिष्ठ पक्ष, अखिल भारतीय छावा, मराठा सेवा संघ, दलित अत्याचार विरोधी समिती, रिपाई गवई गट, बुलंद छावा, फुले शाहू आंबेडकर विचार प्रबोधन, ए आय एस एफ, एस एफ आय, डी वाय एफ आय, लाल निशाण, वेल्फेअर पार्टी, जमात ए इस्लामी, अभा जिवा संघटना, तंजीम ए इंसाफ, जनता दल सेक्युलर, एस आय ओ, समता विद्यार्थी आघाडी, मूळ निवासी संघ, बामसेफ, भीम आर्मी, महात्मा फुले युवा दल, सी टू, स्वराज इंडिया आदींसह परिवर्तनवादी संघटना सहभागी होत्या.

Web Title: esakal marathi news aurangabad news rally for peace