औरंगाबादेत डिजीटल मुन्नाभाईंचा पर्दाफाश! 

मनोज साखरे 
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

परिक्षागृहात परिक्षार्थ्यांनी सीमकार्डचे डिव्हाईस पॅंटमध्ये लपवुन ठेवले होते. कानात मायक्रोफोन घातल्यानंतर शर्टच्या बटणाजवळ असलेल्या छुपा कॅमेऱ्याद्वारे परिक्षार्थ्यांनी प्रश्‍नपत्रिका स्कॅन केली. प्रश्‍नपत्रिका स्कॅन होताच ती सेट केलेल्या इमेलवर आपोआप सेंड होते. तशी या उपकरणात सुविधाच आहे. याचाच आधार घेवून परिक्षार्थ्यांनी परिक्षागृहाबाहेर असलेल्या मित्राच्या ईमेलवर प्रश्‍नपत्रिका पाठवली. त्यानंतर प्रश्‍नांची गाईड, संच व इंटरनेटद्वारे उत्तरे शोधुन बाहेर असलेल्या व्यक्तीने परिक्षार्थ्यांना सीमकार्ड असलेल्या डिव्हाईसवर संपर्क साधला, मायक्रोफोन, ब्लुटुथद्वारे उत्तरे ऐकुन परिक्षार्थी परिक्षा देत होते. अशी माहिती पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली.

औरंगाबाद : डिजीटल साधनांचा वापर करुन महावितरणच्या ऑनलाईन परिक्षेत मुन्नाभाईगिरी करणे विद्यार्थ्यांना चांगलेच भोवले. त्यांना पोलिसांनी रविवारी (ता. 12) बेड्या ठोकल्या असुन बाहेरुन उत्तरे देणारा पसार आहे. परिक्षार्थ्यांनी चक्क छुप्या कॅमेऱ्याद्वारे पेपर स्कॅन करुन तो इमेलद्वारे बाहेर पाठवून मायक्रोफोनद्वारे उत्तरे ऐकून पेपर सोडवत होते. 

जीवन गिरीजाराम जघाळे, (वय :21, रा. पाचपिरवाडी, ता. गंगापूर), निलेश कपुरसिंग जोनवाल (वय-23, रा. डोंगरगाव, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद), पवन कचरु बहुरे (वय- गेवराईवाडी. ता. पैठण), दत्ता कडुबा नलावडे (वय- 22, रा. आपत भालगाव, जि. औरंगाबाद) अशी संशयित चौघांची नावे आहेत. त्यांना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली आहे. औरंगाबादेत महावितरण (महाजनको) या विभागात काही पदांसाठी रविवारी ऑनलाईन परिक्षा जयभवानीनगर येथील परिक्षाकेंद्रात होती. वैकल्पिक असलेल्या परिक्षेत डिजीटल कॉपी करताना चौघे आढळून आले. ही बाब पर्यवेक्षकांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले, यानंतर पोलिसांनी संशयितांना बेड्या ठोकल्या. 

असा केला कारनामा 
परिक्षागृहात परिक्षार्थ्यांनी सीमकार्डचे डिव्हाईस पॅंटमध्ये लपवुन ठेवले होते. कानात मायक्रोफोन घातल्यानंतर शर्टच्या बटणाजवळ असलेल्या छुपा कॅमेऱ्याद्वारे परिक्षार्थ्यांनी प्रश्‍नपत्रिका स्कॅन केली. प्रश्‍नपत्रिका स्कॅन होताच ती सेट केलेल्या इमेलवर आपोआप सेंड होते. तशी या उपकरणात सुविधाच आहे. याचाच आधार घेवून परिक्षार्थ्यांनी परिक्षागृहाबाहेर असलेल्या मित्राच्या ईमेलवर प्रश्‍नपत्रिका पाठवली. त्यानंतर प्रश्‍नांची गाईड, संच व इंटरनेटद्वारे उत्तरे शोधुन बाहेर असलेल्या व्यक्तीने परिक्षार्थ्यांना सीमकार्ड असलेल्या डिव्हाईसवर संपर्क साधला, मायक्रोफोन, ब्लुटुथद्वारे उत्तरे ऐकुन परिक्षार्थी परिक्षा देत होते. अशी माहिती पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली.

Web Title: esakal marathi news students arrested in Aurangabad for cheating

टॅग्स