महावितरण कार्यालयाची  नेकनूर येथे दुरवस्था 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

या कार्यालयातून नेकनूरसह 27 गावांचा कारभार चालतो. त्यामुळे या ठिकाणी ग्राहकांची नेहमीच वर्दळ असते. अनेक वेळा रस्त्यांची कामे झाल्यामुळे हे कार्यालय रस्त्यापासून फूट खाली गेले आहे. कोणाला कार्यालयात जायचे असल्यास अगदी विहिरीत उतरल्याचा अनुभव येतो. कार्यालयात गेल्यानंतर गळके पत्रे, तडे गेलेल्या भिंती, मोडक्‍या खिडक्‍या व अस्वच्छता असा अनुभव येतो.

नेकनूर : सुमारे चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या महावितरण कंपनीच्या कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. येथील पोलिस ठाणे ते बसस्थानक या मुख्य रस्त्यावर सुमारे चाळीस वर्षांपूर्वी हे कार्यालय बांधण्यात आले. गावात अनेक वेळा रस्ते झाले; पण हे कार्यालय मात्र पुरातन वास्तुसारखे आहे.

या कार्यालयातून नेकनूरसह 27 गावांचा कारभार चालतो. त्यामुळे या ठिकाणी ग्राहकांची नेहमीच वर्दळ असते. अनेक वेळा रस्त्यांची कामे झाल्यामुळे हे कार्यालय रस्त्यापासून फूट खाली गेले आहे. कोणाला कार्यालयात जायचे असल्यास अगदी विहिरीत उतरल्याचा अनुभव येतो. कार्यालयात गेल्यानंतर गळके पत्रे, तडे गेलेल्या भिंती, मोडक्‍या खिडक्‍या व अस्वच्छता असा अनुभव येतो. कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करतात. या कार्यालयाचे नवीन बांधकाम होणे गरजेचे आहे अन्यथा अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही. महावितरण कंपनीच्या प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कार्यालयाचे बांधकाम करण्याची मागणी होत आहे. 

Web Title: esakal news beed news neknur news