तुळजापूर : चार पुजाऱ्यांविरुद्ध  गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

 अभिषेक रांगेत भाविकांना घुसविणे, मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे या कारणावरून तुळजाभवानी मातेच्या मंदिरात प्रवेशबंदी असतानाही मंदिरात प्रवेश केल्याप्रकरणी चार पुजाऱ्यांविरुद्ध शनिवारी (ता. आठ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तुळजापूर -  अभिषेक रांगेत भाविकांना घुसविणे, मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे या कारणावरून तुळजाभवानी मातेच्या मंदिरात प्रवेशबंदी असतानाही मंदिरात प्रवेश केल्याप्रकरणी चार पुजाऱ्यांविरुद्ध शनिवारी (ता. आठ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी सांगितले की, तुळजाभवानी मंदिरात केलेल्या गैरशिस्तीबद्दल सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संबंधित पुजाऱ्यांविरुद्ध मंदिर समितीच्या प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची सुनावणीही झाली होती. त्यात ओंकार लक्ष्मीकांत बिस्से यांना चार महिने (7 जून ते 8 ऑक्‍टोबर 17), महेश यंशवत आंबुलगे यांना सहा महिने (1 जून ते 31 डिसेंबर) सूरज बापू साळुंखे यांना चार महिने (1 जून ते 31 ऑक्‍टोबर), बाळू ऊर्फ अभिनव आनंद सोन्जी यांना सहा महिने (1 जून ते 31 डिसेंबर 17) तुळजाभवानी मंदिरात प्रवेशबंदीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. मंदिरात अभिषेक रांगेत भाविकांना घुसवणे, सुरक्षा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे यासंदर्भात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुनावन्याही झाल्या होत्या. बंदी असतानाही मंदिरात प्रवेश केल्याप्रकरणी मंदिराचे धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांनी शनिवारी पोलिसांत फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार ओंकार बिस्से, महेश आंबुलगे, सूरज साळुंखे, बाळू सोन्जी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: esakal news sakal news tuljapur news