कळमनुरीत माजी खासदार शिवाजी माने यांचे उपोषण सुरु,नागरिकही सहभागी

एकंदरीत कयाधु नदीचे पाणी ईसापुर धरणामध्ये वळवण्याचा व सिंचन अनुशेषाचा प्रश्न आता पेटला आहे.
Hingoli Agitation News
Hingoli Agitation Newsesakal

कळमनुरी (जि.हिंगोली) : जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष भरून काढा. तालुक्यातील नियोजित सापळी धरण रद्द करा, कयाधू नदीचे पाणी इसापूर धरणामध्ये (Isapur Dam) वळवण्याचा निर्णय रद्द करावा, या व इतर मागण्यांसाठी माजी खासदार अॅड शिवाजी माने (Former MP Shivaji Mane) यांनी गुरुवारी (ता.२०) तालुक्यातील सालेगाव येथे कयाधू नदीवर उभारलेल्या बंधाऱ्या नजीक अमरण उपोषण सुरू केले. या आंदोलनाला कयाधू नदी काठच्या व सापळी बुडीत क्षेत्रामधील १४ गावांमधील नागरिकांनी पाठिंबा देऊन सहभाग नोंदविला आहे. याबाबत जिल्हा सिंचन संघर्ष समितीच्या वतीने कळमनुरी (Kalamnuri) तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. (Ex MP Shivaji Mane Starts His Hunger Strike In Kalamnuri in Hingoli)

Hingoli Agitation News
लेकीच्या लग्नातील अनावश्यक खर्च टाळला, शेतकरी कुटुंबाच्या घराचे स्वप्न केले पूर्ण

मात्र शासनाकडून या कुठल्याही मागणीची अद्यापपर्यंत दखल घेण्यात आली नाही. शासन लक्ष देण्यास तयार नसल्यामुळे या प्रश्नी आंदोलन तीव्र करण्याची भूमिका जिल्हा सिंचन संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आली होती. त्या अनुषंगाने गुरुवारी तालुक्यातील सालेगाव येथे कयाधू नदीवर उभारलेल्या बंधाऱ्याच्या शेजारी माजी खासदार अॅड शिवाजी माने यांनी आंदोलन सुरु केले. मात्र ऐनवेळी माने यांनी आपण स्वतः अमरण उपोषण करणार असल्याचे सांगून सापळी बुडीत क्षेत्र व कयाधू काठावरील गावांमधील नागरिक लाक्षणिक उपोषण करतील अशी भूमिका घेतल्यामुळे प्रशासनाची धावपळ झाली. (Hingoli)

Hingoli Agitation News
तुळजाभवानी मंदिरातील सुरक्षारक्षकास मारहाण धमकी, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

दुसऱ्या बाजूला आजच्या आंदोलनात माजी खासदार माने यांच्यासह डॉ. वसंतराव पतंगे, दिगंबरराव कदम, सदाशिवराव चौतमल, हरिभाऊ झाकलवाडे, गणेश गुट्टे, गजानन काळे, राम किसन ठाकूर, शेषराव पतंगे, किरण नावडे, दादाराव मुंडे, अवधूत निळकंठे, विद्याधर मगर, शिवाजीराव काळे, आनंदराव डाढाळे, बजरंग गुट्टे, यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहेत. दरम्यान शुक्रवारपासून (ता.२१) सापळी बडीत क्षेत्रांमधील १४ व कयाधू नदी काठावरील प्रत्येक दोन गावांमधील नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एकंदरीत कयाधु नदीचे पाणी ईसापुर धरणामध्ये वळवण्याचा व सिंचन अनुशेषाचा प्रश्न आता पेटला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com