घराला आग लागून माजी सरपंचाचा अंत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

गंगापूर - कनकोरी (ता. गंगापूर) येथील माजी सरपंच बाळकृष्ण रामभाऊ पवार (वय 80) यांच्या जुन्या घराला आग लागून त्यात त्यांचा अंत झाला. घरही जळून खाक झाले. ही घटना रविवारी पहाटे घडली. आमदार प्रशांत बंब यांच्या प्रयत्नाने औरंगाबाद महापालिकेच्या अग्निशामक दलाची गाडी अवघ्या वीस मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर दोन तासांत आग आटोक्‍यात आली. केवळ जुन्या घराचा जिव्हाळा असल्याने बाळकृष्ण पवार हे सागवानी मातीच्या धाब्याच्या घरात राहत होते. रविवारी पहाटे चारच्या सुमारास आग लागली व मातीच्या ढिगारात ते दबले गेले.
Web Title: ex. sarpanch death in fire