राम मंदिर, मशीद आणि छत्रपतींचा पुतळा : कायगावात सलोख्याचा शेजार 

कैलास मगर
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

निल्लोड (जि. औरंगाबाद) : सिल्लोड तालुक्‍यातील कायगाव येथे अनेक वर्षापासून राममंदीर व मशीद एकमेकांच्या शेजारी उभारलेले आहेत. मात्र, गावात आजवर कधीही वाद झालेला नाही. हिंदु-मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या प्रार्थनास्थळांचा सन्मान राखला आहे. विशेष म्हणजे, गावातीलच एका मुस्लिम तरुणाने अनेक वर्षापासून प्रभू श्रीरामाची सेवा करीत बंधुभाव जोपासला आहे. 

दीडशेच्या चड्डीसाठी दिले नकली दोन हजार

निल्लोड (जि. औरंगाबाद) : सिल्लोड तालुक्‍यातील कायगाव येथे अनेक वर्षापासून राममंदीर व मशीद एकमेकांच्या शेजारी उभारलेले आहेत. मात्र, गावात आजवर कधीही वाद झालेला नाही. हिंदु-मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या प्रार्थनास्थळांचा सन्मान राखला आहे. विशेष म्हणजे, गावातीलच एका मुस्लिम तरुणाने अनेक वर्षापासून प्रभू श्रीरामाची सेवा करीत बंधुभाव जोपासला आहे. 

दीडशेच्या चड्डीसाठी दिले नकली दोन हजार

देशभरात अयोध्या प्रकरणाच्या निकालावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. कित्येक संवेदनशील गावांमध्ये, शहरांतून हजारोंनी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्‍यातील साधारण अडीच ते तीन हजार लोकसंख्या असलेल्या कायगावात मात्र हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातील बांधवांनी एकमेकांच्या प्रार्थनास्थळाचा आदर राखत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

नांदेडच्या या यात्रेचे जंगी स्वागत

कायगावात प्रवेश करताच उजव्या हाताला राम-लक्ष्मण-सिता व हनुमानाचे मंदीर आहे, तर डाव्या हाताला मशीद बांधलेली आहे. अनेक वर्षापासून ही प्रार्थनास्थळे एकमेकांच्या शेजारी असूनसुद्धा, आजपर्यंत दोन्ही समाजात कोणताही वादविवाद झाल्याचे ऐकिवात नाही. मशिदीसमोरच्या मोकळ्या जागेत ग्रामपंचतीने बगीचा तयार करून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविलेला आहे. या ठिकाणी गावातील लोक एकत्र येतात आणि सर्व सण, उत्सव, समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम एकत्र, सलोख्याने आणि गुण्यागोविंदाने साजरे करतात. 

रामाचा सेवक शेख सादेक 

कायगावात मंदीर-मशीद शेजारी शेजारी तर आहेतच; पण विशेष म्हणजे गावातील मुस्लिम तरुण शेख सादेक लहानपणापासून प्रभू श्रीराम मंदीरात जाऊन रामाची अखंड सेवा करतात. गावात होणाऱ्या प्रत्येक धार्मिक कार्यात त्यांचा विशेष सहभाग असतो. गावातील तरुणांमध्ये सलोखा राखण्याचा संदेश देणाऱ्या त्यांच्या या प्रयत्नांचे पंचक्रोशीत कायमच कौतुक केले जाते. 

ओरंगाबादच्या या बँकेत मिळतेय बिनव्याजी कर्ज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Example of Social Harmony in Kaygaon Sillod Aurangabad