esakal | हिंगोली वगळता मराठवाड्याच्या ६७ मंडळात अतिवृष्टी
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोली वगळता मराठवाड्याच्या ६७ मंडळात अतिवृष्टी

हिंगोली वगळता मराठवाड्याच्या ६७ मंडळात अतिवृष्टी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात दीर्घकाळपर्यंत विश्रांती घेतल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी पावसाने झड लावली होती. मंगळवार (ता. ३१) सकाळपर्यंतच्या गेल्या चोवीस तासातील आकडेवारीनुसार मराठवाड्याच्या हिंगोली वगळता सात जिल्ह्यांमधील ६७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. म्हणजेच ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

हेही वाचा: नांदेडमध्ये नदीच्या पुरात दोन जण वाहून गेले

मंगळवारी(ता.३१) सकाळपर्यंतच्या चोवीस तासात झालेल्या नोंदीनुसार हिंगोली वगळता उर्वरित सात जिल्ह्यातील ६७ मंडळात अतिवृष्टी झाली. विविध तालुक्‍यात जोरदार ते अतीजोराचा पावसाची हजेरी लागली. बीड जिल्ह्याला पावसाने सर्वाधिक झोडपले. बीड जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी ७५.२ मिलिमीटर पाऊस झाला. त्यापाठोपाठ परभणी जिल्ह्यात सरासरी ३९.७ मिलिमीटर, जालना ३८.४ मिलिमीटर, नांदेड ३७.२ मिलिमीटर, लातूर ३४.३ मिलिमीटर, औरंगाबाद ३०.३ मिलिमीटर, उस्मानाबाद २४.४ मिलिमीटर तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी सरासरी १०.९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

हेही वाचा: संततधार पावसामुळे पैठणमधील पाचोडसह परिसरातील पिके पाण्याखाली

बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ३३ मंडळात अतिवृष्टी झाली. त्यापाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यातील ९, जालना ८, नांदेड ७, परभणी ५, लातूर ४ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील एका मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्‍यातील तलवाडा मंडळात सर्वाधिक २३४.५० मिलीमीटर तर पिंपळनेर मंडळात २१४ मिलिमीटर पाऊस झाला. अतिवृष्टी झालेल्या एकूण मंडळांपैकी २५ मंडळात १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक १३ मंडळांचा समावेश आहे. तसेच लातुर १, नांदेड ३, परभणी ३, औरंगाबाद ४ व जालना एका मंडळात १० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला आहे.

loading image
go to top