पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

पोलिस अधिक्षक विजयुकमार मगर यांनी जिल्हांतर्गत सहाय्यक पोलिस निरीक्षक व फौजदार दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी (ता. १८) रात्री केल्या आहेत.

नांदेड : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या अशासकिय पदावर केल्या होत्या. निवडणुक संपल्याने पोलिस अधिक्षक विजयुकमार मगर यांनी जिल्हांतर्गत सहाय्यक पोलिस निरीक्षक व फौजदार दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी (ता. १८) रात्री केल्या आहेत. 

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मुळ जिल्हा असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना अशासकिय पदावर नियुक्त केले होते. त्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक व फौजदारांचा समावेश होता. निवडणुका संपून आचारसंहिता संपुष्टात आल्याने पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी जिल्हांतर्गत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यात सहाय्यक पोलिस निरिक्षक विश्‍वेश्वर पल्लेवार यांना नियंत्रण कक्षातून लिंबगाव पोलिस ठाणे, विजय जाधव न्यायालय देखरेख पथक ते विमानतळ पोलिस ठाणे, शरद मरे सायबर सेलमधून वजिराबाद, अशोक जाधव यांना स्थागुशातून भाग्यनगर, राजकुमार भोळ यांना स्थागुशातून शिवाजीनगर, अण्णासाहेब पवार यांना जनसंपर्क विभाग ते माहूर, सुनील लहाने यांना नियंत्रण कक्षातून न्यायालय देखरेख पथकात पाठविले आहे. 

तर फौजदारांच्या बदल्यामध्ये प्रविण राठोड यांना वजिराबाद ते स्थागुशा, हरिशचंद्र होळकर शिवाजीनगर ते नियंत्रण कक्ष, चित्तरंजन ढेमकेवाड विमानतळ सुरक्षा ते शिवाजीनगर, आदित्य लाकुळे विमानतळ सुरक्षा ते विमानतळ ठाणे, अनिता दिनकर सायबर सेल ते इतवारा आणि पी. एच. सुरवसे नियंत्रण कक्ष ते अर्धापूर पोलिस ठाणे देण्यात आले आहे. बदली झालेल्या सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी तात्काळ नेमुन दिलेल्या आपल्या पोलिस ठाण्याचा पदभार स्विकारून पोलिस अधिक्षक कार्यालयात आपल्या वरिष्ठांच्या मार्फत कळवावे असे आदेशीत केले आहे. बदली झालेल्यामध्ये बरेच जण मुळ नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी असून काही अधिकारी निवडणुक काळात बाहेर जिल्ह्यातून बदलीवर आले होते. निवडणुक संपल्यानंतर आता या अधिकाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार ठाणे बहाल करण्यात आले. 

सायबर सेल रिक्त

सायबर सेल मधील दोन्ही अधिकाऱ्यांची बदली झाल्याने त्या सेलमध्ये अद्याप कुणाचीच पोस्टींग केली नाही. त्यामुळे स्थानिक गुन्‍हे शाखेचा पदभार व या सेलचा भार पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्यावर पडणार आहे. तर दुसरीकडे शहरातून चोरीला जाणारे मोबाईल व गुन्हेगारांचे लोकेशन मिळणे अवघड झाले आहे. या अतीमहत्वाच्या सेलमध्ये सायबर तंत्रज्ञान अवगत असलेले अधिकारी दिले तर अनेक गुन्ह्याची उकल होम्यस मदत होईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In exchange for police officers