उत्पादन शुल्कचा निरीक्षक पन्नास हजारांची लाच घेताना जाळ्यात

बनावट दारू प्रकरणातून नाव वगळण्यासाठी मागितली होती लाच
bribe
bribebribe

बीड: बनावट दारू प्रकरणाच्या गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्कच्या निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. धानोरा रोडवरील कार्यालयात औरंगाबादच्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने (ACB Aurangabad) बुधवारी (ता. दोन) दुपारी साडेतीन वाजता ही कारवाई केली.

दत्तात्रय लक्ष्मण दिंडकर असे त्या लाचखोर निरीक्षकाचे नाव आहे. तालुक्यातील नागापूर शिवारात ता. सात एप्रिल २०२१ रोजी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक व सहकाऱ्यांनी बनावट दारू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला होता. त्यानंतर अशाच प्रकारे बीडमधील एमआयडीसी येथे देखील बनावट दारूचा प्लँट सुरु असल्याचे समोर आल्यावर तेथेही धाड टाकली होती.

bribe
बाप हरला, पाच वर्षे हमाली केली, सहा लाख केले होते गोळा

दोन्ही ठिकाणी मिळून ८६ लाख एक हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. राज्य उत्पादन शुल्कचे जवान एस.ए. सांगुळे यांच्या फिर्यादीवरून राजू किसन चव्हाण, ऋषीकेश राजू चव्हाण, रोहित राजू चव्हाण, आकाश वेताळ लोकरे, विक्की वेताळ लोकरे (सर्व रा.नवनाथनगर, बीड) , निखिल कचरु घुले (रा.पांडुरंगनगर, बीड) व रवींद्र किसन चव्हाण (रा.जुना मोंढा, बीड) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता.

याचा तपास निरीक्षक दत्तात्रय दिंडकरकडे होता. तपासात यातील आरोपी रोहित चव्हाण व तक्रारदार यांच्यात लाखोंचे व्यवहार झाल्याचे समोर आले होते. त्यावरुन तक्रारदारालाही गुन्ह्यात आरोपी केले होते. तक्रारदाराने अटकपूर्व जामीन करून घेतला होता. गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी ५० हजार रुपये लाच स्वीकारताना दिंडकर अलगद 'एसीबी'च्या सापळ्यात अडकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com