जड दप्तराविना शाळांचा प्रयोग राबवा

सुशांत सांगवे
रविवार, 8 डिसेंबर 2019

  • विक्रम काळे यांचे शाळांना आवाहन
  • ज्ञानरचनावाद व गुणवत्ता संवर्धन कार्यशाळा 
  • ज्ञानरचनावाद व गुणवत्ता संवर्धन कार्यशाळा
  • शिक्षकांना सल्ला

लातूर : गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असतानाच दप्तराचे ओझे कमी असलेल्या शाळा निर्माण करण्याची गरज आहे, असे मत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. प्रत्येक शनिवारी मुलांनी दप्तर आणायचे नाही. हा प्रयोग सर्व शाळांनी प्राथमिक स्वरूपात लागू करावा. तो यशस्वी झाल्यास दप्तरांचे ओझे नसणाऱ्या शाळा निर्माण होतील, असेही ते म्हणाले. 

राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलात शिक्षकांसाठी एकदिवसीय ज्ञानरचनावाद व गुणवत्ता संवर्धन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी काळे बोलत होते. संस्थेचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे, प्राचार्य बी. जी. चौरे, शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे, वरिष्ठ अधिव्याख्याता विजयकुमार सायगुंडे, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष वसंतराव पाटील, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्याक्ष प्रकाश देशमुख, प्राचार्य बाबूराव जाधव, संस्थेच्या अध्यक्षा के. ए. जायेभाये, प्राचार्य संगमेश्‍वर केंद्रे, मुख्याध्यापक स्वाती केंद्रे, वरिष्ठ अधिव्याख्याता अनिल मुरकुटे, सतीश सातपुते, नागेश लोहारे, मारुती कदम, बालाजी शेळके, प्रा. कविता केंद्रे, प्रा. अश्‍विनी केंद्रे उपस्थित होत्या. 

विद्यार्थी आहेत म्हणून शाळा आहेत.
काळे म्हणाले, की विद्यार्थी आहेत म्हणून शाळा आहेत. शाळा आहेत म्हणून शिक्षक आहेत, याचा विसर पडता कामा नये. शिक्षकांनी विद्यार्थी केंद्रबिंदू माणून ज्ञानदानाचे कर्तव्य पार पाडावे. वेगवेगळ्या प्रयोगांतून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावावी. उकिरडे म्हणाले, की शिक्षणक्षेत्रातील नवीन विचारप्रवाह शिक्षकांपर्यंत पोचला पाहिजे. तो शिक्षकांनी स्वीकारला पाहिजे. आपण शंभर टक्के निकालाच्या मागे लागलो आहोत. या शंभर टक्‍क्‍यांत किती विद्यार्थी शास्त्रज्ञ होतील, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

विदेशात कांदा विकु देणार नाही

अजित पवारच आमच्याकडे आले होतेः फडणवीस

काळाची पावले ओळखावीत

काळाची पावले ओळखून विद्यार्थी घडविला पाहिजे. शिक्षकांनी हे काम कर्तव्यभावनेतून करण्याची गरज आहे. चौरे म्हणाले, की विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच दैनंदिन घडामोडींवर आधारित प्रश्‍नांची उत्तरे देता आली पाहिजे. त्यासाठी त्यांना चालना देण्याची गरज आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी नकारात्मक नव्हे, तर सकारात्मक भावनेतून संवाद साधला पाहिजे, असे नमूद करून यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्ञानाची चव चाखता आली पाहिजे. पर्यवेक्षक एस. व्ही. वायचळ यांनी सूत्रसंचालन केले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exercise schools without heavy lifting