esakal | जाणकार म्हणतात, लघू उद्योगांना मिळणार चालना
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli photo

सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठीच्या आर्थिक मदतीची घोषणा अर्थमंत्री सितारामन यांनी जाहीर केली. यानंतर हिंगोली जिल्ह्यातील विविध व्यावसायिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून यामुळे लघू उद्योगांना चालना मिळणार असल्याचे म्हटले आहे.

जाणकार म्हणतात, लघू उद्योगांना मिळणार चालना

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड- १९ महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटाला तोंड देताना २० लाख कोटी रुपयांच्या मदतीची आर्थिक घोषणा केली. आर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या कार्यक्रमाला किंवा योजनेला पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत अभियान म्हटले आहे. 

बुधवारी (ता.१३) अर्थमंत्री सीतारामन यांनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठीच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. यामुळे लघू उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला असून यामुळे उद्योगांना चालना मिळेल, अशी अपेक्षा विविध क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे

हेही वाचा असाही चौदाशे मजुरांना मिळाला रोजगार

बांधकाम व्यवसायांना अच्‍छे दिन येणार

बांधकाम व्यावसायिकांना सहा महिने घर बांधकामात सूट दिल्यामुळे बांधकाम व्यवसायांना अच्‍छे दिन येणार आहेत. यामुळे बाजारात उत्साह वाढेल, इंकम टॅक्‍स भरण्यासाठीदेखील मुदतवाढ मिळाली आहे. आयकर रिफंड तरतूद देण्याची मुभा मिळाली आहे. उद्योगाच्या विकासासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. लोकांनी स्वदेशी वस्तू वापरण्यावर भर देण्यात आला आहे. त्‍यामुळे उद्योगाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
- रमेशचंद्र बगडिया, अध्यक्ष, व्यापारी महासंघ


सर्वांना त्‍याचा लाभ होणार

सुक्ष्म व लघु उद्योगासाठी नॉन गॅरंटी लोन उपलब्ध देण्याची घोषणा केली आहे. त्‍याचा फायदा जवळपास ४५ लाख उद्योगांना घेता येणार आहे. एमएसएमईची गुंतवणूक मर्यादी जी २५ लाख होती. ती आता एक कोटीपर्यंत करण्यात आली आहे. नवीन परिभाषेमुळे सूक्ष्म व लघू उद्योगांची व्याप्ती वाढेल. आयकर रिटर्नची तारीख ३१ जुलै ऐवजी ३० नोव्हेंबर करण्यात आली आहे. यामुळे सर्वांना त्‍याचा लाभ होणार आहे.
-प्रवीण सोनी, सचिव, हिंगोली जिल्हा औद्योगिक संघटना


शेतकऱ्यांसाठी आणखी मदतीची अपेक्षा

बाजारातील मरगळ दूर करण्याचा प्रयत्न, लघू व मध्यम उद्योगाला विकासाकडे नेणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना भरपूर मदत देण्यात आली आहे. स्वदेशी कंपन्यांना भरीव आर्थिक व इतर मदत, शेतकऱ्यांना सरळ त्यांच्या खात्यात दोन हजार रुपये मिळणार आहेत. समाजातील वेगवेगळ्या घटकांचा विचार करून मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारताला आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने वाटचाल मात्र, शेतकऱ्यांसाठी आणखी मदतीची अपेक्षा होती.
-आनंद निलावार, हिंगोली जिल्‍हा सीड, फर्टी, पेस्‍ट, असोसिएशनचे अध्यक्ष

 

येथे क्लिक करा - तळीरामांच्या सुरक्षेसाठी उभारले बॅरिकेट्स, शामियाना

मदत सर्वांसाठी सुखकर ठरणार

विनासॅलरीधारकांचे टीडीएस (कमिशन एजेंट, रेंट, व्याज) यावरील कपात ही आधीच्या रेटच्या २५ टक्‍के करण्यात आली आहे. कंपनी सोडून सर्व इतरांनी इनकम टॅक्स रिफंड काही असेल तर ताबडतोब देण्यात येणार आहे. सरकारकडील थकबाकी असल्यास ४५ दिवसांत मिळणार आहे. यामुळे जनतेकडे तरलता (लिक्विडिटी) जास्त काळ टिकून राहण्यावर सरकारने भर दिला असल्याने ही मदत सर्वांसाठी सुखकर ठरणार आहे.
- राजेश सोमाणी, कर सल्लागार


 

loading image