esakal | तळीरामांच्या सुरक्षेसाठी उभारले बॅरिकेट्स, शामियाना
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli photo

आता प्रशासनाने मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  ग्राहकांसाठी सावली असावी या उद्देशाने दुकानांसमोर शामियाना, बॅरिकेट्स लावण्यात आली आहेत. त्यामुळे दारू खरेदी करताना ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग रहण्यास मदत होणार आहे.

तळीरामांच्या सुरक्षेसाठी उभारले बॅरिकेट्स, शामियाना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कळमनुरी (जि. हिंगोली) : दीड महिन्यापासून बंद असलेली मद्य विक्रीची दुकाने गुरुवारी (ता. १४) व शनिवारी (ता. १६) सुरू होणार आहेत. या निर्णयानंतर तळीरामांच्या आनंदाला पारावार उरला नाही. दुसऱ्या बाजूला मद्य विक्रेत्यांनी दुकानासमोर शामियाना टाकून बॅरिकेट्स लावले आहेत.

लॉकडाउनमध्ये दीड महिन्यापासून मद्य विक्रीची दुकाने बंद आहेत. यामुळे तळीरामांची मोठी गैरसोय झाली आहे. चोरट्या पद्धतीने मिळणाऱ्या दारू विक्रीला ऊत आला होता. यामध्येही दाम दुप्पट भावात दारूची विक्री करण्यात येत होती. ४८ रुपयांना मिळणारी देशी दारूची बॉटल तीनशे रुपयांपर्यंत विकल्या गेली. 

हेही वाचाआवाजाचे गुढ उकलेना, हिंगोली जिल्ह्यात पुन्हा हादरे...

गावठी दारूची बॉटल ७०० ते ८०० रुपयांना

अनेकांनी बनावट दारूची बेभाव विक्री करून आपले उखळ पांढरे करून घेतले. वाढीव पैसे दिल्यानंतरही इंग्रजी बनावटीची दारू मिळत नसल्यामुळे अनेकांनी गावठी दारूला पसंती दिली. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मागील दिवसांत गावठी दारूचे उत्पादन व विक्रीच्या प्रमाणात वाढ झाली होती. एरवी शंभर रुपयांला मिळणारी गावठी दारूची बॉटल ७०० ते ८०० रुपयांना विकल्या गेली. 

मोहफुले व गुळाच्या मागणीत वाढ

कमी भांडवलामध्ये मोठा मुनाफा मिळत असल्यामुळे अनेकांनी गावठी दारू काढण्याच्या धंद्यात उडी घेत हात धुऊन घेतले. गावठी दारूसाठी लागणारे मोहफुले व गुळाच्या मागणीत व किमतीतही मागील दिवसांत मोठी वाढ झाली. मोहफुलांचा भाव वाढल्यामुळे काही ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असलेल्या वस्तूंचा वापर करून गावठी दारूचे उत्पादन घेतले जात होते. 

मद्य विक्रीची दुकाने सुरू होणार

आता प्रशासनाने मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मद्य विक्रीच्या दुकानदारांनी ही दुकाने उघडण्याची परवानगी मिळाल्यानंतर दुकानासमोर होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी व ग्राहकांसाठी सावली असावी या उद्देशाने दुकानांसमोर शामियाना, बॅरिकेट्स व दारू घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी सुरक्षित अंतरावर उभे राहावे, याकरिता मार्किंग करून घेतली आहे. दरम्यान, मद्य विक्रीची दुकाने सुरू होणार असल्यामुळे तळीरामांच्या आनंदाला उधाण आले आहे.

येथे क्लिक करा -  हिंगोलीत १८ जवानांनी जिंकले ‘कोरोना युद्ध’

परवान्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

हिंगोली : मद्य पिण्यसाठी परवान्याची आवश्यकता असून त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस अधीक्षक केशव राऊत यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी व शनिवारी दारू दुकाने सकाळी दहा ते दुपारी एक वाजेच्या सुमारास सोशल डिस्टन्सिंगचे नियम व अटीवरून उघडण्यास परवानगी दिली आहे. मद्य परवाना ऑनलाइन काढण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ‘आपले सरकार डॉट महाऑनलाइन’ या संकेतस्थळाकर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.

एक वर्षासाठी शंभर रुपये फी

 तसेच परवाना काढणाऱ्या नागरिक जिल्ह्यातील रहिवासी असावा, किमान २१ वर्षे पूर्ण असावे, तसेच आजीवन परवाण्यासाठी एक हजार; तर एक वर्षासाठी शंभर रुपये फी ठेवण्यात आली आहे. त्यानुसार मद्य प्राशन करण्याऱ्या ग्राहकांनी ऑनलाइन परवाण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन केशव राऊत यांनी केले आहे. परवाना नसणाऱ्या ग्राहकांना मद्य मिळणार नसल्याचेदेखील श्री. राऊत यांनी सांगितले.
 

loading image
go to top