Latur News : महावितरणच्या पदभरतीला मुदतवाढ ; ‘रोस्टर’ दुरुस्त होण्याची शक्यता

महावितरणमध्ये सध्या मेगा भरती सुरू असून, पाच हजार ९०० पदे भरली जाणार आहेत. मराठा समाजाच्या दहा टक्के आरक्षणाविना (एसईबीसी) ही भरती होत आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांमध्ये नाराजी आहे.
Latur News
Latur Newssakal

लातूर : महावितरणमध्ये सध्या मेगा भरती सुरू असून, पाच हजार ९०० पदे भरली जाणार आहेत. मराठा समाजाच्या दहा टक्के आरक्षणाविना (एसईबीसी) ही भरती होत आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांमध्ये नाराजी आहे. या भरतीसाठी २० मार्च हा अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस होता. पण, महावितरणने अर्ज भरण्यासाठी आता एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे.

या कालावधीत एसईबीसी आरक्षण लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे ‘रोस्टर’ दुरुस्त केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महावितरण काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘महावितरणची पदभरती मराठा आरक्षणाविना’ या मथळ्याखाली ‘सकाळ’च्या बुधवारच्या (ता. २०) अंकात वृत्त प्रकाशित केले होते.

महावितरणने राज्यभरात विद्युत सहायक, डिप्लोमा इंजिनिअरच्या सुमारे पाच हजार ९०० जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी डिसेंबर २०२३ मध्ये जाहिरात काढली. पण, १ मार्च २०२४ ला यासंदर्भातील ‘यूआरएल लिंक’ महावितरणने खुली करून अर्ज मागवले. यासाठी २० मार्च ही अखेरची मुदत होती. या जाहिरातीत दहा टक्के मराठा आरक्षणाचा (एसईबीसी) कोठेही उल्लेख नाही. दुसरीकडे स्वतंत्र आरक्षण लागू झाल्याने महसूल विभाग मराठा तरुणांना ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र देत नाही.

त्यामुळे या पदभरतीत मराठा समाजातील तरुणांना आरक्षणाच्या सवलतीपासून वंचित रहावे लागत आहे किंवा खुल्या प्रवर्गातून अर्ज भरावे लागत आहेत. याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित होताच महावितरणने आता पदभरतीसाठी महिन्याची मुदतवाढ दिली आहे. महावितरणच्या वेबसाइटवर त्याचे नोटिफिकेशन टाकले आहे. १९ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत. मुदतवाढ दिल्याने रोस्टर दुरुस्ती करून हे आरक्षण लागू करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत महावितरण नेमका काय निर्णय घेते, याकडे लक्ष असेल.

Latur News
Latur Crime News : मुलीला जीवे मारून वडिलांनी संपवले जीवन ; आर्थिक अडचणीच्या नैराश्यातून घटना

महावितरणकडून चुकीच्या पद्धतीने ही पदभरती केली जात आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांमध्ये नाराजी आहे. शासनाने जाहीर केलेले दहा टक्के आरक्षणही यात नाही. आता महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवून पदभरती करावी.

- हंसराज जाधव, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा, लातूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com