
जालना : शहरातील किराणा व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण करत चार लाखांची खंडणी घेणारे तीन संशयित अद्याप फरारी आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये संताप आहे. या आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी जालना व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने प्रभारी पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.