आठवडा बाजार उठवला; शेतकरी, व्यापाऱ्यांनी भाजीपाला फेकून केला शासनाचा निषेध

शेतकऱ्यांचा भाजीपाला फेकून नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
Majalgaon News
Majalgaon Newsesakal

माजलगाव (जि.बीड) : जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा (Radhabinod Sharma) यांनी आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश दिलेले असतानाही बुधवारी (ता.१९) माजलगावचा (Majalgaon) आठवडे बाजार (Weekly Market) भरत असल्याने मुख्याधिकाऱ्यांनी बाजार उठविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकत शासनाचा निषेध केला. शहरामध्ये रविवार आणि बुधवार असे दोन दिवस आठवडे बाजार भरतात. कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर मागील तीन बाजारापासून नगरपालिका प्रशासनाकडुन शेतकरी व व्यापाऱ्यांना या ठिकाणी आठवडे बाजार भरविण्यात येऊ नये अशा सूचना दिलेल्या होत्या. परंतु आठवडे बाजार आज बुधवारी भरविण्यात आला होता. (Famers, Traders Throw Their Vegetables On Street In Majalgaon Weekly Market)

Majalgaon News
तानाजी सावंत-राहुल मोटेंना जनतेने नाकारले, वाशी नगरपंचायतीत भाजपला बहुमत

यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवडे बाजार भरविता येणार नाही असे सांगितले. परंतु काही व्यापाऱ्यांनी व काहींनी आठवडे बाजारातील शेतकऱ्यांचा भाजीपाला चक्क रस्त्यावर फेकुन दिला. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी देखील शासनाचा निषेध करत विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाल्याचं करायचं कायं...अस म्हणत आम्ही कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत हा भाजीपाला विकु द्यावा अशी केविलवाणी मागणी शेतकरी करित होते. (Beed)

Majalgaon News
सत्तारांचा दानवेंना 'दे धक्का', सोयगावात शिवसेनेचा भगवा

शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या नियमांचे पालन करा, आठवडे बाजार भरवू नका अशा सुचना व्यापारी व शेतकऱ्यांना वेळोवेळी देण्यात येत होत्या. संक्रांतीचा सण आहे. एवढा बाजार भरवू द्या असे म्हणत व्यापारी व शेतकरी नियमांचे उल्लंघन करत आज बाजार भरविला होता. काही व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकला. शेतकऱ्यांना भाजीपाला गल्लोगल्ली जाऊन विक्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांचा भाजीपाला फेकून नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

- विशाल भोसले, मुख्याधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com