शिवसेनेच्या आधीच नारायणच्या आजीने आणली 10 रुपयांत झुणका भाकर (व्हिडिओ)

famous 10 rupees zunka bhakar parbhani
famous 10 rupees zunka bhakar parbhani

परभणी : शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात 10 रुपयांत जेवणाची थाळी देण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, त्याआधीच परभणीत एकाने झुणका भाकरीचा व्यवसाय सुरु करून बेरोजगारीवर मात केली आहे.

सकाळी नऊ वाजल्यापासून चक्रवर्ती वाघमारे हे त्यांची इलेक्ट्रिकवर चालणारी अॅटोरिक्षा काढतात. त्यात ताज्या - ताज्या भाकरी... त्यासोबत झणझणीत झुणका घेवून त्यांचे दोन कर्मचारी संपूर्ण शहरात फिरत असतात. शासकीय कार्यालये, संस्था आणि इतकेच काय तर कुणी फोन करून ऑर्डर दिली तर थेट घरी देखील हा मेणू पोचविला जातो. 

आर्थिक मंदीने मोठ-मोठ्या कंपन्यातील कर्मचारी कपात झाल्याचे आपण रोजच ऐकत असतो. परंतू कष्ट करून पोट भरणाऱ्यांसमोर कसली आर्थिक मंदी. स्वताच्या हातावर संपूर्ण विश्वास ठेवून पडेल ते काम करणारा कधीच उपाशी झोपत नाही हेच या तरुणाने चालू करून दाखवून दिले आहे.

 

दवाखान्यात दाखल असलेल्या आपल्या आजीला गावावरून आलेला डबा घेण्यासाठी रेल्वेस्थानकावर गेलेल्या नारायणला पाहिले चक्रवर्ती वाघमारे यांनी पाहिले. त्याला तो डबा आणण्यासाठी एकूण 120 रुपये खर्च आला. असा एकूण 120 रुपये खर्च येत असेल तर, आपण येथे 10 रुपयांत झुणका भाकर चालू करु शकतो या प्रेरणेतून ही झुणका भाकर चालू केली असल्याचे चक्रवर्ती वाघमारे सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com