Fake Well Scam : मस्साजोग येथील शेतकरी मिथून देशमुख यांच्या जमिनीवर रोहयो अंतर्गत मंजूर केलेली विहीर प्रत्यक्षात उभारण्यात आली नाही. ग्रामसेवक व रोजगार सेवकाने मिळून बिले उचलल्याचा आरोप करत देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
केज : शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहिरींचे काम केले जाते. मात्र, या कामात लाभार्थ्याऐवजी अधिकाराचा गैरवापर करत प्रशासकीय कर्मचारीच माया कमवित असल्याचे चित्र आहे.