बीड जिल्ह्यात कर्जबाजारी शेतकरी व तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 मार्च 2019

यंदा नापिकीमुळे कर्ज फेडण्याच्या विवंचनेत ते होते. यातूनच त्यांनी सोमवारी सकाळी हे पाऊल उचलले. घटनेनंतर पोलीस निरीक्षक सुरेश खाडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

बीड/वडवणी : एक कर्जबाजारी शेतकरी व एका तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटना सोमवारी (ता. 4) बीड व वडवणी तालुक्यात घडल्या. दामोदर गणपती शिंदे (वय 45, रा. पिंपरखेड, ता. वडवणी) व महादेव रामभाऊ भोसले (वय 35, रा. खर्डेवाडी, ता. बीड) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. 

पिंपरखेड (ता. वडवणी) येथील दामोदर गणपती शिंदे यांनी नापिकी व कर्जफेडण्याच्या चिंतेतून गळफास लाऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे बँकेचे कर्ज थकलेले आहे. तसेच, यंदा नापिकीमुळे कर्ज फेडण्याच्या विवंचनेत ते होते. यातूनच त्यांनी सोमवारी सकाळी हे पाऊल उचलले. घटनेनंतर पोलीस निरीक्षक सुरेश खाडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

दुसरी घटना खर्डेवाडी (ता. बीड) येथे घडली. महादेव रामभाऊ भोसले (वय 35) या तरुणाने शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. अल्पभूधारक असल्याने त्याला व्यवसायासाठी कर्ज भेटत नसल्याच्या कारणाने निराशेतून त्याने हे पाऊल उचलल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer and youth commit suicide in Beed district because of Debt