कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या 

Suicide Hanging
Suicide Hanging

नांदेड : सततची नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना माळेगाव (ता. लोहा) शिवारात रविवारी (ता. 10) दुपारी घडली. 

लोहा तालुक्यातील माळेगाव येथील शेतकरी सखाराम देविदास धूळगंडे  (वय 25) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापीकी होत होती. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने शेतातील उत्पन्न घटले. अगोदरच कोरडवाहू शेती असल्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबुन आहे. निसर्गाच्या लहरी पणामुळे शेतकरी हवालदील झाला. अखेर त्याने या दुहेरी संकटाला त्रासून माळेगाव शिवारातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. केरबा नारायण धुळगंडे यांच्या माहितीवरुन माळाकोळी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हवालदार श्री. वाघमारे हे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com