esakal | विहिरीत उडी मारून शेतकऱ्याची आत्महत्या : जिंतूर तालुक्यातील  घटना
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आर्थिक विवंचनेत सापडून स्वतःच्या शेतामधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार (ता. तीन) घडली. याप्रकरणी गुरुवारी (ता. पाच) येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विहिरीत उडी मारून शेतकऱ्याची आत्महत्या : जिंतूर तालुक्यातील  घटना

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर

जिंतूर (जिल्हा परभणी) : तालुक्यातील पाचेगांव येथे साठ वार्षीय वृद्ध शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे  पिकाचे नुकसान झाल्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या आर्थिक विवंचनेत सापडून स्वतःच्या शेतामधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार (ता. तीन) घडली. याप्रकरणी गुरुवारी (ता. पाच) येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जिंतूर-औंढा महामार्गालगतच्या पाचेगांव शिवारात शिवारातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके पुर्णतः नष्ट झाल्याने येथील रामभाऊ बहिरट या वृद्ध शेतकऱ्याने डोक्यावरील कर्जफेडीच्या विवंचनेत सोमवारी (ता. दोन) रात्री स्वतःच्या शेतामधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.ते घरी आले नसल्याने कुटुंबीयांनी दुसरे दिवशी त्यांचा शोध घेतला असता मंगळवारी (ता. तीन) सकाळी आठच्या सुमारास रामभाऊ यांचा म्रतदेह त्यांच्या भावाला विहिरीत तरंगताना आढळून आला. त्यानंतर गावातील छत्रभुज ससे आणि इतर ग्रामस्थांच्या मदतीने म्रतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. 

येथे क्लिक करा - कृषी विद्यापीठातील अधिकारी- कर्मचाऱ्याचे सामुहिक रजा आंदोलन

याप्रकरणी मयत शेतकऱ्याचा मुलगा धम्मपाल बहिरट याच्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता.पाच) आकस्मिक मृत्यू म्हणून घटनेची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर महसूल विभागातर्फे करण्यात आलेल्या पंचनाम्यात मयत शेतकरी यांच्याकडे बँकेचे ९९ हजार रुपये कर्ज असल्याची माहिती संबंधित विभागाकडून सांगण्यात आली. मयत रामभाऊ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image