Farmer Crop Damage : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतात साचले तळे, अनेक शेतकऱ्यांची दिवाळी होणार कडू

मका पिकाचे हब म्हणून ओळखले जाणाऱ्या मराठवाडा आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मका पिकाचे मोठे नुकसान
Marathwada
Marathwada sakal

मराठवाडा : मका पिकाचे हब म्हणून ओळखले जाणाऱ्या मराठवाडा आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीला तलावाचे स्वरूप आले असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांची दिवाळी कडू होणार आहे. हाता तोंडाला आलेला घास निसर्ग असा हिसकावून घेत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याकडे शासनाचे लक्ष नाही, मराठवाड्याकडे कायम उपेक्षित ठेवल्या जाते, अनुशेष भरून काढले जात नाही, मदत मिळत नाही अशी मराठवाड्यातील शेतकऱ्यांची सरकार वरती आरोप आहे. मराठवाड्यामध्ये सर्वदूर अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन मका कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कोणत्या प्रकारचे पंचनामे करता सरसकट मदत मिळावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.

मराठवाड्यामध्ये मका सोयाबीन आणि कापूस याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. मका व सोयाबीन पिकाचा हा मळणीचा हंगाम असतो. अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने हातातला घास हिसकावला गेला आहे. शासनाने कोणत्याही प्रकारचे पंचनामे करत बसण्यापेक्षा तात्काळ सरसकट मदत जाहीर करावी अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे.

शेतकरी नानासाहेब धामणे औरंगाबाद, पिसादेवी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com